Close Visit Mhshetkari

Credit Card : क्रेडिट कार्डचे महत्त्वाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे का? घ्या जाणून सविस्तर..

Credit Card : नमस्कार मित्रांनो आपण क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो पण आपल्यासाठी योग्य क्रेडिट कार्ड कोणतं हे आपल्याला माहिती नसतं क्रेडिट कार्डचा वापर करण्याअगोदर क्रेडिट कार्डचे प्रकार किती आहे. व कोणते क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी योग्य आहे. याविषयी आपल्याला माहिती पाहिजे असते. तर ही माहिती आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत.

क्रेडिट कार्डचे प्रकार

1 बिझनेस क्रेडिट कार्ड 

बिजनेस क्रेडिट कार्ड हे लघु मध्यम मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असते याला आपण को-ऑपरेटिव्ह क्रेडिट कार्ड सुद्धा म्हणतो.आपला व्यवसाय चालवताना पैशांची गरज भागवण्यासाठी ही एक वेगवान सुविधा आहे. 

आपला व्यवसाय करत असताना पैशाची गरज भागवण्यासाठी ही एक वेगवान स्वरूपाची सुविधा आहे. या कार्डद्वारे व्यवसायाशी निगडित उत्तम सुविधा आपल्याला उपलब्ध होतात. जसे की जमा व खर्चाची देखरेख या सर्व सुविधा आपल्याला ह्या कार्डद्वारे मिळतात जसे की प्रवास व निवास व्यवस्था आणि मनोरंजन इत्यादी सुविधा मिळतात.

2 सिल्व्हर क्रेडिट कार्ड 

हे कार्ड नोकरदार वर्गाला मिळू शकते. सिल्वर कार्ड हे कमी सदस्यता शुल्क खात्यातील बाकी हस्तांतरित करताना व्याजदर  पहिले सहा ते सात महिने पर्यंत शून्य टक्के असतो जर क्रेडिट कार्ड धारकाची क्रेडिट हिस्टरी चांगली असेल तर कार्ड ची मर्यादा इतर क्रेडिट कार्ड प्रमाणेच आहे 

हे पण पहा --  Credit Card : क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

3 गोल्ड क्रेडिट कार्ड 

गोल्ड क्रेडिट कार्ड हे ज्या ज्या लोकांचे उच्च उत्पन्न असते अशांसाठी हे क्रेडिट कार्ड असते. याचे क्रेडिट रेटिंग देखील जास्त प्रमाणात असते हे एक स्टेटस सिम्बॉल समजले जाते .या कार्डची 

व्हिसा गोल्ड कार्ड असल्‍याने तुम्‍हाला प्रवास सहाय्य, व्हिसाच्‍या जागतिक ग्राहक सहाय्य सेवा मिळतात. हे कार्ड जगभरात स्वीकारले जाते. गोल्ड कार्ड ग्लोबल नेटवर्कशी जोडलेले राहते. याशिवाय रिटेल, डायनिंग आणि एंटरटेनमेंट आउटलेटवर तुम्हाला याचा फायदा होतो

4 प्लॅटिनम कार्ड

प्लॅटिनम कार्ड हे ग्राहकाला रोख वितरणापासून ते जागतिक एटीएम नेटवर्क पर्यंत सुविधा देते. तसेच वैद्यकीय व कायदेशीर संदर्भातील देखील सुविधा उपलब्ध करून देते. शिवाय कार्डचा वापर करून तुम्ही हजारो डील डिस्काउंट ऑफर आणि अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.

5 टायटॅनियम कार्ड 

प्लॅटिनम कार्डच्या तुलनेत तुम्हाला टायटॅनियम कार्डमध्ये अधिक क्रेडिट मर्यादा मिळते. हे कार्ड सामान्यतः चांगला क्रेडिट इतिहास आणि लक्षणीय उत्पन्न असलेल्या लोकांना मिळते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment