Cibil Score Increase : तुम्हाला जेव्हा कर्ज घेण्याची वेळ येते. त्या अगोदर बँक तुमचा सिबिल स्कोर कसा आहे. हे बघत असते आणि तुमचा जर काही कारणास्तव सिबिल स्कोर घसरलेला असेल तर बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवणे अवघड जाते. किंवा मिळतच नाही.
आणि एखाद्या बँकेने तुम्हाला कर्ज दिले सिबिल स्कोर खराब असताना तर तुम्हाला जास्त व्याज आकारले जाते. यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला ठेवला पाहिजे.
तुमचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.
1 कर्ज वेळेवर भरा.
तुमचे कर्ज नियमितपणे आणि वेळेवर भरा. हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेत भरले नाही. तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या सिबिल स्कोर होत असतो . जर तुम्ही त्या तारखेलाच ईएमआय भरला तर तुमचा सिबिल स्कोर वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते.
2 कर्जाला गॅरेंटर होऊ नये
तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा गॅरेंटर आहे. पण त्या व्यक्तीने वेळेवर कर्ज परतफेड केले नाही. तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होतो.
3 वारंवार सिबिल स्कोर तपासावा
सिबिल स्कोर खराब होऊ नये यासाठी वारंवार सिबिल स्कोर तपासावा यामुळे तुमचा स्कोर किती आहे व चांगला आहे की खराब आहे याविषयी तुम्हाला माहिती मिळते व त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करता.
4तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित करा.
तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 50% पेक्षा जास्त वापरू नका.तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करा.व
क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची जी सायकल आहे ती पूर्ण होण्या आधी क्रेडिट कार्डचे बिल भरले तर वेळेत क्रेडिट कार्डचे बिल भरले तरी तुमचा सिबिल स्कोर खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होते.
सिबिल स्कोर कमी होण्याची कारणे
तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर भरले नाही तर तुमचा सिबिल स्कोर खराब होतो.
क्रेडिट कार्डचा वापर प्रमाणात बाहेर केल्यावर आणि तुमच्या क्रेडिट रिपोर्ट मध्ये त्रुटी असल्यावर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होत असतो.
तुम्ही एकापेक्षा जास्त नवीन कर्जासाठी अर्ज केले असता यामुळे देखील तुमचा क्रेडिट स्कोर खराब होत असतो.
सिबिल स्कोर आणि कर्ज
तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण निर्माण होत नाही. व सिबिल स्कोर चांगला असल्यानंतर तुम्हाला कर्ज कमी व्याजदराने देखील मिळते आणि कर्ज जास्त देखील मिळू शकते.