Cibil Score:- नमस्कार मित्रांनो सिबिल स्कोर हा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक बनलेला आहे. मित्रांनो आपल्याला कोणती विद्या संस्था किंवा बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करते, आणि कर्ज दिले तरी आपल्याला जास्त व्याजदर आकारला जातो.
Online Credit score check
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की अनेक कारणामुळे आपला सिबिल स्कोर घसरत असतो.ज्यामध्ये कर्ज हप्ते वेळेवर न भरणे एखादा जामीनदार असेल , तर त्यांनी त्याची कर्ज वेळेवर न भेटणे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर पेमेंट न करणे. वारंवार कर्ज चौकशी करणे या कारणाने आपला सिबिल स्कोर घसरत असतो. हा सिबिल स्कोर केव्हा वाढेल आणि वाढवण्यासाठी काय उपाय आहेत.याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
EMI चुकले तर सिबिल स्कोर घसरतो?
समजा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये हप्ते वेळेवर भरता आले नाही परंतु तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणी आल्या किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली तर घेतलेल्या कर्जांचे हप्ते थांबवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.
एखाद्या वेळेस आपण जर कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही कालावधीनंतर आपण डिफॉल्ट श्रेणीमध्ये जाऊ शकतो त्यामुळे आपण आपली एम आय ची रक्कम कालांतराने जमा जरी केली तरी आपल्याला वाटते की आता आपला सिबिल स्कोर सुधारेल परंतु मित्रांनो तसं नाही यासाठी खूप कालावधी लागत असतो साधारणपणे दोन वर्ष याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो.
मित्रांनो घसरलेल्या सिबल स्कोर चे तोटा म्हणजे वित्तीय संस्थांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.आपला सिबिल किंवा क्रेडिट स्कोर खराब झाल्यानंतर बँक आपल्याला कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करतात. एखाद्या वित्तीय संस्थेने कर्ज देण्यास तयारी दर्शवली तरी आपल्याला खूप मोठा व्याजदर लावतात.
How to improve credit score ?
- आपला सिबिल स्कोर सुधारण्याचे काही प्रमुख मार्ग आहेत त्याविषयी आपण आता चर्चा करूया
- पहिला म्हणजे आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे
- आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्डचे बिल न चुकता बेड करणे,
- वारंवार कर्ज चौकशी केल्याने सुद्धा आपला क्रेडिट स्कोर कमी होत असतो
- आपल्याला मिळालेल्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त वापर न करणे साधारणपणे 80% पर्यंतची रक्कमच आपण वापरावी
- आपल्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज असेल त्यांनी सुद्धा आपला क्रेडिट कोड सुधारण्यास मदत होते तसे होम लोन पर्सनल लोन क्रेडिट कार्ड गोल्ड लोन इत्यादी