CIBIL SCORE : आपल्याला जेव्हा कर्ज घ्यायचे असते. तेव्हा सर्वप्रथम बँक तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो. तुमचा जर सिबिल स्कोर खराब असेल. तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. तुमचा सिबिल स्कोर तुमच्या विश्वासाची ग्वाही देतो तुमचा जर सिबिल स्कोर खराब असेल. आणि बँकेने जर तुमची कर्ज देण्याला नकार केला. असेल तरीसुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकते तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ते कसे मिळणार चला याविषयी माहिती पाहू .
खाली काही विशिष्ट प्रकारचे कर्ज आहेत जे तुम्ही खराब CIBIL स्कोअर असतानाही मिळू शकते ?
- NBFC : जर तुमच्या सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळत नसेल गरज असेल तर तुम्ही NBFC मध्ये अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला कमी सिबिल स्कोर मध्ये कर्ज मिळू शकते परंतु त्याचे व्याजदर बँकेच्या व्याजदरापेक्षा थोडे जास्त राहते.
- संयुक्त कर्जदार:जर तुमच्या मित्राचा किंवा कुटुंबातील सदस्याचा CIBIL स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत संयुक्त कर्ज घेऊ शकता. यामुळे तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता वाढेल आणि तुमच्यासाठी कर्ज मिळणे सोपे होईल.
- गोल्ड लोन:तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सोन्याची किंवा इतर मौल्यवान वस्तूंची गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. कमी कागदपत्रांमध्ये तुम्हालाही लोन मिळत असते.तुमचे सोने सुरक्षा म्हणून ठेवले जाते आणि सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या 75 टक्के कर्ज मिळू शकते.
- अॅडव्हान्स पगार:काही कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना पगाराच्या आधी कर्ज देतात.आगाऊ पगाराचा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करू शकता.
- पर्सनल लोन:काही वित्तीय संस्था खराब CIBIL स्कोअर असलेल्या लोकांना वैयक्तिक कर्ज देतात, परंतु त्यांचे व्याजदर जास्त असू शकतात.
- एफडीवर कर्ज: तुमच्या एफडीवर देखील कर्जासाठी अर्ज करू शकता, किंवा एलआयसी किंवा पीपीएफ सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या रकमेच्या आधारे कर्ज दिले जाते.
अशाप्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर खराब असताना देखील कर्ज घेऊ शकता. वरील सर्व कर्ज तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर कमी असताना देखील मिळू शकते.