Close Visit Mhshetkari

Cibil Score : पॅनकार्ड विना आपला सिबिल स्कोअर कसा चेक करायचा ? पहा संपूर्ण प्रोसेस

Cibil Score : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत.याशिवाय भारतात कोणत्याही महत्त्वाच्या व्यवहाराला मान्यता मिळत नाही. मोबाईल सिम कार्ड पासून तर बँकिंग व्यवहारापर्यंत पॅन कार्ड अनिवार्य असते.आयकर, केवायसी, बँक लोन यासारख्या महत्त्वाच्या कामासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक असते.

Cibil Score Check Without Pan Card

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की,कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आपला सिबिल स्कोर सर्वात अगोदर चेक केला जातो.विशेष म्हणजे आपला सिबिल स्कोर चेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे पॅन कार्ड.सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा तीन अंकी आकडा असतो. सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यानचा असतो.

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) द्वारे तयार केलेला हा स्कोअर हा एक मूलभूत घटक मानला जात असून जवळपास बऱ्याच बँका आणि इतर वित्तीय संस्था व्यक्तीची कर्ज पात्रता ओळखण्यासाठी याचा वापर करतात.

आपला सिबिल स्कोर जर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर आपल्याला सहज कर जो उपलब्ध होते साधारणपणे 650 सिबिल स्कोर असेल तर जास्त व्याजदराने व्याज मिळू शकते त्यापेक्षा कमी सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना बँक कर्ज ना करू शकते.

हे पण पहा --  Free CIBIL check : आपला क्रेडिट स्कोअर 2 मिनिटात मोफत कसा चेक करायचा ? येथे पहा डायरेक्ट लिंक 

परिणामी सिबिल स्कोर चांगला ठेवणे काळाची गरज बनलेली आहे दरम्यान आपला सिबिल स्कोर पॅन कार्ड विना कसा चेक करावा याची माहिती आपल्याला नसते तर आज आपण पॅन कार्ड आपला सिबिल स्कोर कसा चेक करावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पॅन कार्ड नसल्यास सिबिल स्कोर चेक कसा करायचा ?

  • सर्वात प्रथम,तुम्हाला https://www.cibil.com या अधिकृत CIBIL वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • मुख्यपृष्ठावर, “वैयक्तिक CIBIL स्कोअर” या विभागावर जा.
  • या विभागात, “तुमचा CIBIL स्कोअर मिळवा” या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि संपर्क माहिती यासह तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  • जरी तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तरीही तुम्ही CIBIL स्कोअर तपासू शकता.तुम्ही खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र निवडू शकता:
  • * पासपोर्ट
  • * मतदार ओळखपत्र
  • * ड्रायव्हिंग लायसन्स
  • * रेशनकार्ड
  • तुम्ही निवडलेल्या ओळखपत्राचा क्रमांक प्रविष्ट करा.
  • तुम्हाला तुमचा वैध मोबाईल नंबर प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. तुमच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल.
  • OTP प्राप्त झाल्यावर ते प्रविष्ट करा आणि अटी आणि शर्तींना तुमची सहमती दर्शवा.
  • यशस्वी नोंदणी आणि सत्यापन झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर आणि त्यासोबतच तुमचा क्रेडिट अहवाल पाहता येईल.

Leave a Comment