Close Visit Mhshetkari

Business Loan : मोठी बातमी … व्यवसायासाठी कर्ज हवे आहे? चर्मोद्योग विकास महामंडळाकडे लगेच करा अर्ज !

Business Loan : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात. यापैकी 50% अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे.व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजनालाभदायी ठरत आहेत. या योजनेविषयीची माहिती पाहूयात.

व्यवसाय कर्ज योजना | Business Loan

चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते. 

महामंडळ प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 20 टक्‍के बीज कर्ज म्‍हणून द.सा.द.शे.4 टक्‍के व्‍याजदराने देते व या अर्थसहाय्यापैकी रू.10,000/- रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते.

रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कर्जाच्या रकमेपैकी जास्तीत जास्त 10 हजार रुपये पर्यंत 50 % रक्कम महामंडळाकडून सबसिडी म्हणून दिली जाते. उर्वरित 50 % कर्जाची परतफेड 36 ते 60 महिन्याच्या समान हफ्त्यांत किंवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यात करावी लागते.

हे पण पहा --  Bank loan offers : मोठी बातमी.. या बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका; होम लोन,कार लोन,पर्सनल लोन महागले; पहा डिटेल्

व्यवसाय कर्ज पात्रता ?

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. 
  • अर्जदाराच्या वयाची 18 ते 50 वर्षे अशी आहे. अर्जदारास निवडलेल्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे.

आवश्यक कागदपत्रे 

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • जातीचा दाखला
  • कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • प्रमाणपत्र, 
  • रेशन कार्ड
  • अनुभवाचा दाखला. 
  • ग्रामपंचायत व तत्सम शासकीय कार्यालयांचे ना हरकत
अर्ज करा करावा ?

या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अधिक माहितीसाठी आपल्या जिल्हयातील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment