Close Visit Mhshetkari

BEL Recruitment : कामाची बातमी … भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती ! येथे लगेचच करा अर्ज

BEL Recruitment : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली आहे. भरती संदर्भात अर्ज,फी, पात्रता, पदे आणि पगार विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

BEL Apprentice Recruitment 2024

सदरील भरतीअंतर्गत 100 हून अनेक विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ पदे (Apprentice Job) भरण्यात येणार आहेत. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकणार आहे.

️अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 15 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.

रिक्त पदे :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 100 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली असून एकूण 115 विविध पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.

बेल भरती रिक्त पदे यादी

  • यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : 30 पदे
  • संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) : 15 पदे
  • दूरसंचार अभियांत्रिकी (Telecommunication Engineering) : 30 पदे
  • स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) : 20 पदे
  • आधुनिक कार्यालय व्यवस्थापन (Modern Office Management) : 20 पदे
हे पण पहा --  Central Bank Apprentice Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘शिकाऊ उमेदवार’ पदांकरीता मोठी भरती प्रक्रिया ; पहा सविस्तर माहिती

शैक्षणिक पात्रता :- जाहिराती नुसार भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

️वयोमर्यादा :- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयाची 3 वर्षे सूट असून SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल.

पगार / मानधन :- या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,500 रुपये मानधन दिलं जाईल.

निवड प्रकिया :- या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवड केली जाईल. भरतीत निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

भरती संदर्भात अधिक माहितीसाठी nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

1 thought on “BEL Recruitment : कामाची बातमी … भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती ! येथे लगेचच करा अर्ज”

Leave a Comment