Bank Salary Account : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. बँका आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा पुरवत असते तसेच बँकेकडून पगार खाते देखील आपल्याला पुरविले जात असते. पगार खाते म्हणजे ज्या खात्यात दर महिन्याला पगार जमा होतो अशा खात्याला पगार खाते म्हणतात.
तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तर तुमचे पगार खाते हे नक्कीच असेल आणि पगार खाते हे देखील एक प्रकारचे बचत खाते म्हणून ओळखले जाते. तुमच्या पगार खात्यामध्ये शून्य शिल्लक असेल तर याचा काय परिणाम होतो याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
सॅलरी अकाउंटवर झिरो बॅलन्स सुविधा
सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे बचत खाते आहे. या खात्यात कर्मचाऱ्यांचा पगार जमा केला जातो. सॅलरी अकाउंटवर अनेक सुविधा उपलब्ध आहे, ज्यात झिरो बॅलन्स सुविधा समाविष्ट आहे. या सुविधांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगार खात्यात किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नसते.
सॅलरी अकाउंटवर झिरो बॅलन्स सुविधा मिळवण्यासाठी खातेधारकांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा लागतो.
Bank Salary Account benifits
- खातेधारकांना त्यांच्या खात्यात पैसे जमा रक्कम शिल्लक न ठेवता विविध प्रकारचे व्यवहार करणे शक्य होते.
- खातेधारकांना बँकेकडून दंड भरावा लागत नाही.
- खाते धारकांना पगार खात्यावर मोफत चेकबुक, पासबुक, नेटबँकिंग सुविधा मिळतात.
- याशिवाय पगार क्रेडिटबाबत प्राप्त झालेल्या एसएमएससाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- तुम्हाला पर्सनल लोन, कार लोन किंवा होम लोन इत्यादी सहज मिळू शकतात कारण बँकेकडे तुमच्या उत्पन्नाचा भक्कम पुरावा राहतो.
- बँका तुमच्या विषयी आश्वस्त आणि जोखीम कमी राहते. त्यासाठी कागदपत्रांची पडताळणीही सहज होते.
- खातेधारकांना बँकेकडून कोणत्याही प्रकारचे विमा योजना किंवा इतर सुविधा मिळत नाहीत.
शासन परिपत्रक –
वित विभागाच्या दिनांक ८/१०/२०२० च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लामाबाबत माहिती दिलेली आहे. सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे.
तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि.९.२.२०१८ रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन बैंक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोअर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील.
आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पुल अकाऊंट (पार्किंग अकाऊंट) वित्त विभागाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीयकृत बैंकेत किंवा अन्य बैंकेत उघडावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२२०१११३१५९१२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.