Close Visit Mhshetkari

Bank Of India Interest Rate : बँक ऑफ इंडिया ने केले पर्सनल लोन व होम लोन व्याजदरात वाढ ? काय आहेत व्याजदर पहा सविस्तर

Bank Of India Interest Rate : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतामध्ये आपल्याला पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक या 12 पाहायला मिळतात पब्लिक सेंटर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचा देखील त्यामध्ये समावेश होतो.  

याच बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बँक ऑफ इंडियाच्या MCLR बाबत आहे.

या बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी बँक ऑफ इंडिया MCLR बाबत आहे. 

Bank Of India Interest Rate

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार बँक सरकारी बँकेनेMCLR दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे साहजिकच या बँकेच्या ग्राहकांना आता मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

बँकेने घेतलेल्या या नवीन निर्णयांमुळे आता बँकेकडून दिले जाणारे होम लोन, पर्सनल लोन यांसारखे सर्व प्रकारचे कर्ज महाग होणार आहे.

 वाढीचा काय परिणाम होईल

गृहकर्ज: गृहकर्ज महाग होईल, ज्यामुळे नवीन घर खरेदी करणे आणि कर्जाची EMI भरणे अधिक कठीण होईल.

वाहन कर्ज: वाहन कर्ज देखील महाग होईल, ज्यामुळे नवीन वाहन खरेदी करणे अधिक कठीण होईल.

वैयक्तिक कर्ज: वैयक्तिक कर्ज महाग होईल, ज्यामुळे लोकांना त्यांचे आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे अधिक कठीण होईल.

MCLR दरात किती वाढ झाली

बँक ऑफ इंडिया ही एकमेव बँक नाही ज्याने MCLR दरात वाढ केली आहे. आरबीआयने नुकतेच रेपो दर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी MCLR दरात वाढ केली आहे.

महागाईमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांगायचे झाल्यास बँक ऑफ इंडियाने MCLR दरात 0.05% एवढी वाढ केली आहे.

या बँकेने याबाबत सविस्तर निवेदन केल्यास सोन्यात बँकेने सांगितले आहे की नवीन MCLR दर आजपासून अर्थातच एक मार्च 2024 पासून लागू होणार आहे.

आता या बँकेचा 1 महिन्याचा MCLR दर 8.35 टक्के, 3 महिन्यांचा MCLR दर 8.45 टक्के, 6 महिन्यांचा MCLR दर 8.65 टक्के, 1 वर्षाचा MCLR दर 8.85 टक्के आणि 3 वर्षांचा MCLR दर 9.05 टक्के एवढा राहणार आहे.

सूचना: सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्या.तुमच्या कर्जाची EMI लवकर भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल.तुमच्या आर्थिक गरजे नुसार कर्ज घ्या.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment