Close Visit Mhshetkari

Bank loan : ‘या’ सरकारी बँकांनी दिला ग्राहकांना झटका, कर्ज महागले; पहा किती होणार खिशावर परिणाम ..

Bank loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एप्रिल महिन्यात रिझर्व बँकेच्या पत धोरणासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये व्याजदर संदर्भात काय निर्णय घेण्यात येतो ?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 

तत्पूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. या बँकानी व्याजदरात वाढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कोणत्या आहेत बँक आणि किती फरक पडणार ? पहा सविस्तर माहिती.

Bank of India Loan interest Rate

मित्रांनो बँक ऑफ इंडिया ने आपल्या लेंडिंग रेड मध्ये दहा बेसिक पॉईंट ने वाढ केली आहे. त्यामुळे रिटेल कर्जे मागणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने पाच एप्रिल रोजी पत धोरण आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यापूर्वीच संबंधित बँकेने व्याजदर वाढवल्याने ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.

बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील.बँकेने सांगितले आहे की, ‘मार्क अप’ ०.१ टक्क्यांनी वाढवले आहे. यामुळे तो २.७५ टक्क्यांवरून २.८५ टक्के झाला आहे. सध्या रेपो दर ६.५ % आहे. अशा परिस्थितीत Repo Rate वर आधारित व्याजदर ९.३५ % असणार आहे. 

हे पण पहा --  Bank Dividend : लाभांश संदर्भात बँकांसाठी नवे नियम ? RBI कडून सुधारित प्रस्ताव जाहीर ...

Indian Bank loans

दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असलेल्या इंडियन बँकेने ही आपल्या बेस्ट आणि स्टॅंडर्ड प्राईज लेंडिंग रेट संबंधित व्याजदर आज ०.५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

नवीन दर ३ एप्रिलपासून लागू होणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पतधोरण बैठकीत रिझर्व बँकेकडून ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे बँक रेपो रेट जैसे ते ठेवण्यात येण्याचा अंदाज अर्थतज्ञ कडून वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment

व्हॉट्सॲप गृप जॉईन करा