Close Visit Mhshetkari

Bank FD : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे काय तोटे आहे? जाणून घ्या सविस्तर…

Bank FD :  एफडी हे गुंतवणुकीचे उत्तम लोकप्रिय पर्याय आहे एफडी मध्ये तुम्हाला मूर्तीचे आणि फायदे तसेच तोटे देखील आहे तर आज आपण तोटे याविषयी माहिती पाहणार आहोत.

FD मध्ये गुंतवणूक करतात पण त्यांना होणाऱ्या नुकसानाची कल्पना नसते आज आम्ही तुम्हाला एफडी मध्ये गुंतवणुकीचे पाच तोटे सांगणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा.

FD गुंतवणुकीचे तोटे खालील प्रमाणे आहे

1. कमी परतावा

सध्या, एका वर्षाच्या एफडीवर व्याजदर सुमारे 6% आहे. महागाईचा दर 8% च्या आसपास आहे, त्यामुळे एफडीचा परतावा महागाईच्या वाढीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कालांतराने कमी होते.

2. कमी लिक्विडिटी

एफडीमध्ये गुंतवणुकीची लिक्विडिटी कमी असते. एफडीची मुदत संपल्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. जर तुम्हाला एफडीच्या मुदतीच्या आधी पैसे हवे असतील, तर तुम्हाला शुल्क भरावे लागते

3. कर लाभ मर्यादित

एफडीवरील कर लाभ मर्यादित आहेत. 5 वर्षांच्या कार्यकाळाच्या एफडीवर तुम्हाला कर लाभ मिळू शकतो, परंतु जर तुम्हाला यावर मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळाली तर तुम्हाला कर द्यावा लागतो.

हे पण पहा --  Green Fixed Deposit : बँक ऑफ बडोदाने लाँच केली "ग्रीन अर्थ डिपॉझिट स्कीम" ! मिळणार 'इतके' व्याज

4. व्याजदरात बदल

बँका व्याजदर बदलू शकतात. एफडीमध्ये गुंतवणुकीपूर्वी, तुम्ही बँकेकडून व्याजदराची माहिती घ्यावी. जर व्याजदर कमी झाला तर तुमचा फायदा देखील कमी होतो.

5. गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य न होणे

गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा वापर एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी करायचा असेल, तर एफडी, हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही

6 व्याजदर महागाईपेक्षा कमी असू शकतात

बराच वेळा महागाईचा दर एफडी वरील व्याजापेक्षा जास्त राहतो. एवढेच नाही तर, तुम्ही निर्धारित मर्यादेपूर्वी बँकेतून तुमची रक्कम काढली असेल तर बँकेकडून तुम्हाला जमा केली पेक्षा एक पैसाही ,जास्त मिळत नाही.

एफडीमध्ये तुम्हाला संपूर्ण कार्यकाळामध्ये एकसारखे व्याज मिळते. बँक तुम्हाला वचन दिलेल्या टक्केवारीपेक्षा एक रुपया सुद्धा महागाईनुसार त्यामध्ये काही बदल करत नसते. त्यामुळे एफडीचा परतावा महागाईच्या वाढीपेक्षा कमी राहतो. यामुळे तुमच्या बचतीची खरी मूल्य कमी होते.

पीपीएफमध्ये तुम्हाला 8.1% व्याज मिळते. हे व्याज दर महागाईच्या वाढीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पीपीएफमधील गुंतवणूक तुमच्या बचतीचे, मूल्य वाढवते. , पीपीएफमधील गुंतवणूक करमुक्त असते . त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणताही कर भरावा लागत नाही.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment