ATM Card Rules : नमस्कार मित्रांनो आजकाल बहुतेक लोक बँक खाते उघडतात त्यासोबत आपल्याला बँक पासबुकसह एटीएम कार्ड आणि चेकबुक सुद्धा मिळत चेक बुक च्या माध्यमातून अनेक दुकानदार त्यासोबतच व्यावसायिक व्यवहार करताना आपल्याला आढळतात.
दैनंदिन व्यवहारासाठी पैशाची गरज भागवण्यासाठी आपण बँकेत न जाता एटीएम कार्ड च्या साह्याने सर्रास पैसे काढत असतो,परंतु एखाद्या वेळेस आपल्या नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या एटीएम कार्ड मधून पैसे काढणे कायदेशीर आहे ? का नियम काय सांगतो पाहूया सविस्तर
ATM Card Cash Withdrawal Rules
मित्रांनो मृत्यू व्यक्तींच्या एटीएम कार्ड मधून पैसे काढू नयेत अनेकदा घरातील किंवा कुटुंबातील व्यक्ती वृत व्यक्तीच्या खात्यातून एटीएम द्वारे पैसे काढण्याचा प्रयत्न परंतु हे कायदेशीर नृत्य चुकीचे आहे. यामुळे कायदेशीर कारवाईला आपल्याला सामोरे जावा लागू शकते.
पैसे काढण्याची योग्य पद्धत
मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी आपल्याला कायदेशीर पद्धतीचा अवलंब करावा लागतो.ज्यामध्ये खातेदाराच्या वारसांना त्याच्या पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. बँक खात्याला नॉमिनी असलेले व्यक्ती रीतसर बँकेत जाऊन पैसे काढू शकतो.जर बँक नॉमिनी नसेल तर कोर्टातून वारसदार व्यक्ती बँक खात्याचा वारसदार म्हणून नियुक्त करता येऊ शकतो.
नॉमिनी व्यक्ती असल्यास
आपण जर मृत व्यक्तीच्या खात्यास वारसदार असाल तर, मृत व्यक्ती संदर्भात माहिती बँकेला देणे आवश्यक असते.बँकेत जाऊन तुम्हाला एका फॉर्ममध्ये व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रासोबत एक फॉर्म भरून देऊन पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड जमा करावे लागते. बँकेकडून खातर जमा झाल्यानंतर आपण बँकेतून पैसे काढू शकतो.