Close Visit Mhshetkari

Agriculture Loan: तुम्हाला एक एकर जमिनीवर किती कर्ज मिळते ? काय आहे मर्यादा व कर्ज मिळण्याचे स्वरूप…

Agriculture Loan :- नमस्कार मित्रांनो शेतकरी वर्गासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी वर्गाला पैशाची गरज असते. अशा वेळेस वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे अतिशय महत्त्वाचे राहते कारण शेतीचे कामे हे पैशावर चालते व पैसा नसेल तर ते कामे रखडतात. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पीक कर्जाला अतिशय महत्त्व आहे.

सरकार शेतकऱ्यांना विविध योजनांमधून आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु बँकेचे माध्यमातून मिळणारेपिक कर्ज हे शेतकऱ्यांना वेळेवर काही वेळेस मिळत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण पीक कर्जाचा विचार केला तर शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार बँक पीक कर्ज देत असते.

मित्रांनो साधारणपणे तुम्हाला एका एकर क्षेत्रावर किती कर्ज मिळू शकते? हे शेतकरी वर्गाला माहीत असणे आवश्यक आहेशेतकऱ्यांना मिळणारे कर्ज व किसान क्रेडिट कार्डचे फायदे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहू.

एकएकर जमिनीवर किती कर्ज मिळू शकते? 

जमिनीचा क्षेत्र नुसार विचार केला तर एक एक कर क्षेत्रावर शेतकऱ्याला जास्तीत जास्त 30 हजार पर्यंत कर्ज मिळते परंतु जर शेतकरी किसान क्रेडिट कार्ड असेल तर ह्याच्या माध्यमातून किमान 50 ते कमाल तीन लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्ज मिळणे शक्य होते म्हणून शेतकरी वर्गाने किसान क्रेडिट कार्डचा वापर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या कर्जाचे स्वरूप हे त्याचे उत्पन्न जमीन क्षेत्रफळ मग गेल्यावर्षीचे पीक यावर अवलंबून राहते परंतु किसान क्रेडिट कार्ड चा वापर केल्यानंतर शेतकरी वर्गाला वार्षिक 7 टक्के व्याज दराने कर्ज मिळते आणि जर शेतकऱ्याने त्याचे कर्ज वेळेत परतफेड केली तर त्यांना 60 टक्के व्याजदरामध्ये तीन टक्के सवलत सरकारच्या माध्यमातून देण्यात येते म्हणजेच शेतकऱ्याला फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज परतफेड करावी लागते जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळू शकतो.

हे पण पहा --  Kisan Credit Card आता किसान क्रेडिट कार्ड वर सर्व शेतकऱ्यांना मिळणार तीन लाख रुपये कर्ज

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

1- तुम्हाला सर्वात जवळच्या तुमच्या सरकारी बँकेत जावे लागेल.

2- बँकेतील अधिकाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड साठी विचारणा करावी .

3- बँकेच्या अधिकाऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्डसाठी दिला गेलेला फॉर्म तुम्हाला भरावा .

4- सर्व माहिती तुम्हाला अचूक भरणे गरजेचे असून यामध्ये तुम्हाला तुमचा नाव, पत्ता तसेच मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकणे गरजेचे आहे.

5- फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे त्याला जोडा.

6- त्यानंतर फॉर्म आणि कागदपत्रे बँकेचे अधिकारी कडे द्या.

7- ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्पीड पोस्ट च्या माध्यमातून तुमच्या घरी किसान क्रेडिट कार्ड पाठवले जाते.

किसान क्रेडिट कार्डकरिता लागणारे कागदपत्रे

मित्रांनो केसान क्रेडिट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, ड्रायव्हिंग ,लायसन तसेच पासपोर्ट, साईज फोटो व जमिनीचा सातबारा व खाते उतारा आवश्यक आहे.

Leave a Comment