Close Visit Mhshetkari

Admission to SPI : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक व युवतींना सुवर्ण संधी; सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेश सुरू…

Admission to SPI : नमस्कार तुमच्यासाठी अत्यंत महत्त्व पूर्ण माहिती समोर आलेली असून सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत संभाजीनगर तसेच सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक यांच्या अंतर्गत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .यामध्ये वृत्त या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याविषयी सविस्तर माहिती.

Notification for admission to SPI

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे.

जून २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या ४८ व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या दुसऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता :- (अ) अविवाहित (मुलगा/मुलगी) (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी. (क) जन्म तारीख: ०२ जानेवारी २००७ ते ०१ जानेवारी २०१० च्या दरम्यान, (ड) मार्च/एप्रिल मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा । बसणारी. (इ) जून २०२४ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे

शारीरिक पात्रता :- 

सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावे. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणे :- उंची – मुलांसाठी कमीत कमी १५७ सें.मी., मुलींसाठी कमीतकमी १५२ सें.मी., वजन – ४३ कि.ग्रा., रातांधळेपणे किंवा रंगांधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता – ७४ सें.मी., फुगवून – ७९ सें.मी. NDA/INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी.

लेखी परीक्षा आणि मुलाखत

पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २८ एप्रिल २०२४ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० माकांचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई.च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

६. मुलांसाठी ऑनलाईन अर्ज www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज www.girlspinashik.com 1 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रुपये ४५०/- (परत न करता अण्णाजीणे) ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल, तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

७. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. ८. हॉल तिकीट :- दिनांक १० एप्रिल २०२४ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.

परीक्षा संबंधित सूचनांसाठी मुलांनी www spiaurangabad.com हे संकेतस्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही हद्याबाबत सूचना दिल्या जाणार नाहीत वं मुलींनी www.girlspinashik.com

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment