Close Visit Mhshetkari

Aadhaar Card : व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्डचे काय होते? सरकारी योजनांचा फायदा वारसांना मिळतो का ? पहा सविस्तर …

Aadhaar Card : सध्याच्या काळात आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे.प्रत्येक सरकारी आणि खासगी कामासाठी आधार हे महत्वाचे कागदपत्र ठरते. आधार 12 अंकांचा एक खास क्रमांक असतो.आधारकार्ड मध्ये आपले नाव, जन्मतारीख,पत्ता आणि फिंगरप्रिंट इत्यादी बाबींचा समावेश असतो.

Aadhaar Card New Updates

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की विना आधार कार्ड आपण कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.गॅस कनेक्शन पासून शाळेतील ऍडमिशन,बँक व्यवहार, पॅन कार्ड, सबसिडी इतर सर्व लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असते.

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या आधार कार्डचे काय होते ? तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या आधारच्या मदतीने तुम्हाला सवलती सुरु ठेवता येतात का? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

मयताच्या आधारचे काय करावे ?

UIDAI तर्फे भारतातील प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड देण्यात येते आता जन्म झालेल्या बाळाची सुद्धा आधार कार्ड काढणे कंपल्सरी करण्यात आले असून तशी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. परंतु सध्याआधार कार्ड रद्द करण्याची अथवा मयत व्यक्तीचे आधार कार्ड सरेंडर करण्याची कोणतीच व्यवस्था नाही.

हे पण पहा --  Aadhar Card : बापरे ... तब्बल 4 प्रकारचे असते आधार कार्ड, तुम्हाला माहिती आहे का?

परणामी आधार कार्डचा गैरपूर होण्याची भीती अनेकदा असते मयत व्यक्ती च्या नावे अनेक जण रेशन, विविध सबसिडी व अनुदानाचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.

मित्रांनो सध्या तरी आधार कार्ड सरेंडर अथवा ते रद्द करता येत असले तरी आधार कार्ड लॉक करता येते. आपण आधार लॉक केल्यानंतर इतर व्यक्ती आपल्या आधार कार्डचा डेटा एक्स करू शकत नाही. ज्यांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांनी या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, यासाठी ही काळजी घ्यावी.

How to lock unlock Adhaar Card

  • सर्व प्रथम UIDAI च्या www.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • आता My Aadhaar Services वर जावा. 
  • याठिकाणी Lock/Unlock Biometrics पर्याय निवडल्यावर नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी लॉगिन करण्यासाठी 12 अंकांचा आधार क्रमांक नोंदवा.
  • कॅप्चा कोड टाकून Send OTP वर क्लिक करा.
  • शेवटी ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डेटाला लॉक/ अनलॉक करण्याचा पर्याय दिसेल,त्याची निवड करा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment