Wheat Farming : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. आपल्याला माहितीच आहे .की आता संपूर्ण राज्यांमध्ये रब्बी हंगाम सुरू झालेला असून देशात विविध भागांमध्ये रब्बी पिक पेरणी झाली आहे. रब्बी हंगामामध्ये हरभरा आणि गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते .तसेच हे सर्वाधिक पेरली जाणारी पिके आहेत.
महाराष्ट्र मध्ये ह्या दोन पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. यादरम्यान गहू पेरणीचा विचार केला असता गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
गहू पेरणीस उशीर झाल्यास
मात्र ज्या शेतकऱ्यांना गव्हाची वेळेवर पेरणी करता येत नाही. असे शेतकरी बांधव डिसेंबर महिन्यात देखील गव्हाची पेरणी करू शकतात. पण उशिराने गहू पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असते.
मात्र ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची गहू पेरणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक ही महत्त्वाची बातमी ठरली जाणार आहे अशा शेतकऱ्यांनी गहू पेरणी डिसेंबर महिन्यात देखील केली तर चांगलेच आहेत पण मात्र गहू पेरणी ही उशिरा केल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती वाटत असते.
27 डिसेंबर नंतर गहू पेरणी करू नये असा देखील अंदाज तज्ञांनी वर्तवला होता .एवढेच नाही तर उशिरा गहू पेरणी करताना लागवडीसाठी उपयुक्त वाणाची निवड करणे आवश्यक आहे .तुम्ही जर उपयुक्त तसेच दर्जेदार वाणाची निवड केली तर तुमचा गहू लवकरात लवकर येऊ शकतो आणि तुमच्या पेरणीला उशीर जरी झाला असेल तरी देखील तुमचे उत्पन्न चांगले होईल.
सध्याच्या परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्यांनी अजून देखील गव्हाची पेरणी केली नाही .अशा शेतकऱ्यांसाठी उशिरा येणाऱ्या गव्हाच्या जाती आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.
गव्हाची सुधारित जात कोणती ?
- गव्हाची हलना K-68 ही एक प्रकारची गव्हाची सुधारित जात आहे .ही जात उशिरा पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची समजली जाते.
- या वाणाविषयी सांगायचे झाल्यास तुम्ही या वाणाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये करू शकता.
- विशेष म्हणजे उशिरा पेरला जाऊ शकणारा गव्हाचा हा वाण अधिक उत्पादनासाठी ओळखला जातो.
- या वाणाला उशिरा पेरल्या जाणारे वाण म्हणून देखील ओळखले जाते.
- ह्या गव्हाच्या वाणापासून 32 ते 40 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळाल्याचा दावा केला जात आहे.
- तुम्ही जो नोव्हेंबर महिन्यामध्ये गहू पेरता पाण्याच्या बरोबरीत तुम्हाला याचे उत्पन्न मिळणार आहे.
- शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या बाबतीत दर्जेदार वाण म्हणून ओळखले जाते.
- हे वाण सरासरी 120 ते 130 दिवसात परिपक्व झाल्यानंतर.
- या जातीपासून 32ते 40 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन तुम्हाला मिळू शकते.
- या गव्हाची विशेषता सांगायची झाल्यास चार पाण्यामध्ये हे वाण परिपक्व होते.