Close Visit Mhshetkari

Wheat Farming : रब्बी हंगामात संधीचं सोनं करा! गहू लागवडीचा बेत असेल तर ‘या’ जातीची लागवड करा

Swaragauri technoWheat Farming : शेतकरी (Farmer) बांधवांसाठी साठी महाराष्ट्रात उत्पादीत केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती विषयी माहिती आज आपण पाहणार आहोत.ज्यामध्ये कमी कालावधी आणि पाणी लागणारेवाण कोणते आहेत? तसेच उत्तम दर्जाचे दाणे आणि बाजारात मागणी असलेल्या वाणांचा सामावेश आहे.

महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या प्रमुख जाती खालीलप्रमाणे :

 

तपोवन (NIAW: 917) :- गव्हाची ही एक सुधारित जात असून बागायती क्षेत्रासाठी उत्कृष्ट जात म्हणून ओळखली जाते.हे एक गव्हाचे हे एक उत्कृष्ट सरबती वाण आहे.या गव्हाची वेळेवर पेरणी केल्यास अधिक उत्पादन मिळते.या गव्हाच्या जातीची वेळेवर पेरणी करण्यासाठी शिफारस केली गेली आहे. या जातीच्या गव्हात ओंब्याची संख्या जास्त असते मात्र दाणे मध्यम असतात. या जातीच्या गव्हात प्रोटीन साडेबारा टक्के आढळते.

श्रीराम सुपर 303 (Shriram Super 303) : – अत्यंत चांगले वाण असून मित्रांनो या वाणाचा कालावधी आहे 125 ते 130 दिवस आणि उत्पादनाचा विचार करायचा झाला तर 25 ते 28 प्रतिक्विंटल प्रति प्रति एकर यावानापासून उत्पादन मिळते आणि या वनाला तीन ते पाच पाण्याची आवश्यकता असून कमी उंची कमी उंची असलेलं वा नसून याची उंची 80 ते 88 cm असते आणि पेरणीचा कालावधीचा विचार करायचा झाला तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये याची आपण पेरणी करू शकतो.

लोक – 1 महिको :- अत्यंत चांगले वाण असून मित्रांनो याचा कालावधी आहे 120 ते 130 दिवसाचा आहे. उत्पादनाचा विचार करायचा झाला तर एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत याचे उत्पादन होते.यासाठी चार ते पाच पाण्याची आवश्यकता असून याची उंची मध्यम स्वरूपाची असते .पेरणीचा हंगामा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये असतो.

हे पण पहा – कपाशीचे पातेगळ थांबवून 100% बोंडात रूपांतर कसे होईल.

हे पण पहा --  Wheat Farming : तुम्हाला गहू पेरणीला उशीर झालाय का? गव्हाच्या ह्या वाणाची पेरणी करा, तुम्हाला मिळेल हेक्टरी 40 क्विंटल गहू!

श्रीराम सुपर 111 ( Shriram super 11) :- महाराष्ट्रातील लोकप्रिय वाण असून या वाणाचा कालावधी आहे 115 ते 120 दिवस उत्पादनाचा विचार करायचा तर एकरी 22 ते 25 क्विंटल पर्यंत उत्पादन झालेले असून या वाणासाठी पाच चार ते पाच पाण्याची आवश्यकता असते.उंची साधारणपणे जास्त असल्यामुळे हार्वेस्टरने याची आपल्याला काढणी करता येते. त्याचबरोबर याची पेरणी आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात करू शकतो.

Top wheat variety in Maharashtra

अजित 109 ( Ajeet 109) :- अजित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अत्यंत लोकप्रिय वाण असून मित्रांनो या वाणासाठी 105 ते 110 दिवसाचा कालावधी लागतो.कमी दिवसांमध्ये येणार असून या वन पासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार करायचा झाला तर एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत ॲवरेज आलेले आहे. या वाणासाठी चार ते पाच पाण्याची आवश्यकता असून मध्यम उंचीचे वाण आहे.

त्र्यंबक (NIAW 301) :- गव्हाचे हे वाण देखील संपूर्ण महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे वाण असून गव्हाचे हे वाण सुधारित वाण म्हणून ओळखले जाते.बागायती शेतात वेळेवर पेरणीसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.हे देखील एक मुख्य सरबती वाण म्हणून ओळखले जाते.या जातीच्या गव्हाचे दाणे टपोरे आणि मोठ्या आकर्षक असतात.
या वाणाच्या गव्हात बारा टक्क्यांपेक्षा अधिक प्रोटीन आढळते. गव्हाची ही जात देखील गव्हासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे.या जातीच्या गव्हाच्या पिठापासून देखील उत्कृष्ट दर्जाच्या चपात्या बनत असतात.अशा परिस्थितीत या जातीची देखील बाजारात मोठी मागणी असते आणि चांगला बाजारभाव देखील मिळतो. या जातीच्या गव्हाची पेरणी केल्यानंतर अवघ्या 115 दिवसात उत्पादन मिळते.

हे पण पहा – लम्पी आजाराचा प्रभाव माणसावर होतो का?

 

Leave a Comment