Close Visit Mhshetkari

Weight Loss वजन वाढलय,’हे’ घरघुती उपाय करून लगेच करा कमी

Weight Loss  : वजन नक्कीच वाढलेलं असेल या विचाराने अनेक जण चिंतेत आहेत. पण स्वतःवर काही बंधन घालून खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचं पालन केलं, घरच्या घरी होण्यासारखे काही व्यायाम प्रकार केले तर तुमचं वजन न वाढता तुम्ही नक्कीच फिट राहाल.फिट कसं राहता येईल या विषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.

weight loss
weight loss

Weight Loss Exercise

आजकाल तर घरी व्यायाम करणे देखील सोपे झाले आहे. तुम्ही गुगलवर सर्च केल्यास,अनेक व्हिडिओ दिसतील ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. विश्वास ठेवा बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहून आपले वजन कमी केले आहे. आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता

घरी करायचा व्यायाम

– जंप स्क्वेट एक्सरसाइज (Jump Squat Exercise)

– लेग लिफ्ट एक्सरसाइज (Leg Lift Exercise)

– दोरी उडी (Skipping)

– पुशअप एक्सरसाइज (Push Up Exercise)

– उठाबशा

– डान्स (Dance)

– झुम्बा (Zumba

Weight Loss Tips At Home

खूप पाणी पिणे 

वजन कमी करण्यासाठी उपाय करताना तुम्ही पाण्याचा सर्वात पहिला उपयोग करून घेऊ शकता. पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. पाण्याचे सेवन हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

मध आणि लिंबू (Honey and Lime)

वजन कमी करणे उपाय करताना तुम्हाला मध आणि लिंबाचा वापर करता येतो. लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला याचा नक्की फायदा होतो. वास्तविक लिंबामध्ये असलेले विटामिन सी आणि मधातील अँटिऑक्सिडंटहे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी मध आणि लिंबूपाणी प्यायलात तर तुम्हाला लवकरच याचा परिणाम दिसून येतो.

ग्रीन टी (Green Tea) 

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवनदेखील फायदेशीर ठरते.

टॉमटो (Tomato)

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला टॉमेटोचा उपयोग करता येऊ शकता. वास्तविक टॉमेटोमध्ये कमी प्रमाणात कॅलरी आणि सोडियमचे प्रमाण असते. तसंच यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसंच मूत्रवर्धक प्रभावही यामध्ये जास्त असतो.टॉमेटोमधील याच पोषक तत्व आणि गुणांमुळे वजन कमी  होण्यास मदत होते.

काकडी (Cucumber)

वजन कमी करण्यासाठी करताना तुम्हाला काकडीचा उपयोग करता येतो.वास्तविक कमी कॅलरीयुक्त पदार्थामध्ये याचा समावेश करता येतो. कारण यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असते. हेच कारण आहे की, पॅलिओ डाएटचा आधार घेत तुम्ही काकडीचा वापर करा.तुम्ही डाएटमध्ये काकडी खाण्याला जास्त प्राधान्य दिले.

 बीट खाणे 

वजन कमी करण्यासाठी बीट खाल्ल्यामुळे वजन लवकर कमी होते सेवन करण्यामुळे लिपिड मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते.तसेच वजन कमी करण्यास याचा उपयोग होतो. त्यामुळे घरगुती उपायाचा तुम्ही विचार करत असाल तर बीट नक्की उपयोग करा.

फायबरचे सेवन वाढवा

फायबरने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरून राहिल्याने तुम्हाला भूक कमी लागते. तसेच अन्न व्यवस्थित पचवण्याचे काम करते. त्यामुळे रताळे, सफरचंद, बीन्स इत्यादींचा आहारामध्ये समावेश करा.

व्यायाम (Exercise)

नुसत्या खाण्या पिण्याच्या सवयींवर तुमचे वजन असते असे नाही. तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे महत्वाचे असते. त्यामुळे या सात दिवसांमध्ये तुम्हाला व्यायामदेखील करायचा आहे. तुम्ही नेमका कोणता व्यायाम करणार आहात त्याचेही एक वेळापत्रक बनवून घ्या. वजन कमी करण्यासाठी योगासने सुद्धा आहेत ती तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता.

साखरेऐवजी गुळाचे सेवन करा साखरे ऐवजी गूळ सेवन करणे चांगले या गोष्टी टाळा     मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं कमीतकमी सेवन करा. तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अतिरेक टाळा.

vajan kami karnyasathi upay
१० दिवस प्या लवंगचे पाणी, कमी होईलमैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं कमीतकमी सेवन करा. तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अतिरेक टाळा.

सकाळचा नाश्ता

सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी

7 वा 8 वाजता – मोड आलेले मूग, चणे किंवा सलाड/दलिया/ओट्स + लस्सी/ताक/ज्युस + फळ

दुपारचं जेवण

12 ते 2 दरम्यान – 1 वाटी आमटी + 1 पातळ पोळी + हिरवी भाजी + काकडी आणि टॉमेटो सलाड

रात्रीचं जेवण

8 वा 9 वाजता  – 1 प्रोटीन वा ड्रायफ्रूट्सचा लाडू किंवा  साखरेशिवाय एक वाटी दही

वजन नियम कमी करण्यासाठी उपाय

1. जेवण्यापूर्वी सूप प्या

2. हेल्दी ब्रेकफास्ट करा

3. थोड्याथोड्या वेळाने खात राहा

4. जेवणात मिरचीचा उपयोग करा

5. रात्री ग्रीन टी प्या

6. उदास न राहता हसत राहा

7. साखरेपासून लांब रहा

8. झोप पूर्ण होऊ द्या

9. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास चाला

10. दिवसभर हलका व्यायाम करणे आवश्यक आहे

सूचना – डाएटदरम्यान तुमच्या शरीरातील पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमचं शरीर नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकंच तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम जास्त होणार. मात्र याचा अर्थ असा नाही की, अति पाणी प्यावं. आपल्या शरीरातील वजनाप्रमाणे 10 ने भागल्यास त्यातून 2 वजा केल्यास, जितकी संख्या येते तितकं लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला (Take Doctor’s Advice)

कोणतीही नवी गोष्ट ट्राय करण्याआधी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण तुम्हाला जर काही त्रास असतील तर तुम्ही हा डाएट करायला हवा की, नको हे तुम्हाला तुमचे डॉक्टर अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. त्यामुळे डॉक्टरांनी होकार दिल्यानंतरच हे डाएट करा.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment