Close Visit Mhshetkari

Weather Update Today : पुढील 48 तासांत परतीच्या पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Weather Update Today : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की माहितीचा प्रवास सुरू केला असून परतीच्या पावसामुळे देशातील विविध राज्यांमध्ये धुमाकूळ घातलेला आहे.

देशातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. येत्या काही दिवसांत देशातून मान्सून पूर्णपणे माघारा घेईल.भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, पाऊसमान व हवामान अंदाज कसा राहील याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.

IMD Weather new Update

मित्रांनो देशातील बिहार झारखंड मध्य प्रदेश मधील काही भागांमध्ये परतीचा पावसाची बघायला मिळणार आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला अंदाज कर्तव्य आलेला आहे .

महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मान्सूनची पूर्णपणे माघार घेईल.

देशाच्या विविध भागात परती पाऊस

देशातील दक्षिणेकडील राज्य तामिळनाडू कर्नाटक मध्ये विभागाच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आले असून नैऋत्य मानसून माघारी फिरत असल्याने बिहार मध्य प्रदेशात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा अंदाज किंवा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकात 9 आणि 10 ऑक्टोबरला परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तसेच, केरळमध्ये 10 आणि 11 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे पण पहा --  Imd Weather Update : घटस्थापनेच्या मुहूर्तावर पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह देशाच्या या भागांत पावसाची शक्यता;  

मुंबई, दिल्लीत ढगाळ वातावरण

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई दिल्लीसह आज हवामान स्वच्छ राहील मुंबई सध्या तापमान वाढत असून ऑक्टोबर मध्ये मुंबईकरांना बसणार आहे तसेच दहा ऑक्टोबर पासून दिल्लीमध्ये पावसाचा अंदाज ऑक्टोबर आलेला आहे.

दिल्ली मध्ये किमान तापमान 22 अंश, तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सोमवारी आणि मंगळवारी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सिक्किममध्ये पूरस्थिती

सिक्किममध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, सिक्कीममधील महापुरानंतर तेथे अडकलेल्या पर्यटक, कामगार आणि स्थानिकांचे मदत आणि बचावकार्य सुरू आहे रविवारी रस्ते संपर्क नसलेल्या भागातून एकूण 206 जणांची सुटका करण्यात आली होती.

Leave a Comment