New voter registrationVoter registration : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होत असतात.या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते.पुढील वर्षी नाशिक व अमरावती या दोन विभागांत पदवीधर मतदारसंघाच्या,तर औरंगाबाद,नागपूर,कोकण या विभागांसाठी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार असून त्यासाठी नव्याने मतदार नोंदणी सुरू झाली आहे.
पदवीधर मतदार नोंदणी
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पुर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करून झालेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.पदवीधर मतदारसंघासाठी फाॅर्म नंबर १८ भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात.अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची छायांकित प्रत आणि मतदान ओळखपत्र झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
शिक्षक मतदार नोंदणी
पदवीधर मतदार नोंदणी प्रमाणेच विधानसभा शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी साठी नव्याने मतदार नोंदणी आवश्यक आहे.
शिक्षक मतदार नोंदणीचा कालावधी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ असून शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेत शिक्षक प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केली आहे.तेव्हा आपण जर शिक्षक असाल तर शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र.१९ भरा आणि आजच शिक्षक मतदार व्हा.
विधानसभा शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्रता
१. भारताचा नागरिक असावा
२. मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असावा
३. एक नोव्हेंबर २०२२ पूर्वी लगतच्या सहा वर्षातील किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत शिक्षक असावा
शिक्षक मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
१. रहिवासी पुरावा (मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / वीज-पाणी-गॅस जोडणीचे देवक इत्यादी)
२. विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र
३. कागदपत्रातील नावात बदल असल्यास राजपत्र / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / संबंधित कायदेशीर पुरावा
(वरील कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षांकित व पदनिर्देशित
अधिकायाकडून अधिप्रमाणित करून जोडणे आवश्यक)
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी प्रक्रिया 2022
पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची नोंदणी पुर्ण झाल्यावर प्रारूप मतदार यादी दि. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्धी केली जाईल. संबंधित यादीवर दावे व हरकती घेण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ हा आहे. तर २५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकालात काढले जाऊन अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
शिक्षक मतदार नोंदणी अर्ज कोठे मिळेल
शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे संकेतस्थळ,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांत उपलब्ध आहे.
पदवीधर मतदार नोंदणी अर्ज येथे डाऊनलोड करा
⇒ Forms No – 19
शिक्षक मतदार नोंदणी अर्ज येथे डाऊनलोड करा
⇒ Forms No – 18
निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ – http://coo.maharashtra.gov.in