Voter list Download: मतदान करायचे म्हटले तर गावातील मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, तसेच आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती जसे की नाव,शिक्षण,गुन्हे,संपत्ती याची माहिती असणे आवश्यक असते.घरबसल्या आपल्या गावाची मतदार यादी कशी करायची? तसेच आपले नाव मतदार यादीत कसे पाहायचे हे आपण या लेखात पाहणार आहोत.
Download Voter list
आपल्या गावची मतदार यादी कशी पहायाची ?आपल्या गावची मतदान यादी पाहण्यासाठी स्टेप फॉलो कराव्या लागतात.
- मतदार यादी pdf voter list पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्ही Election Commission of Maharashtra असे टाईप करून सर्च करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर ceo.maharashtra.gov.in म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पेज ओपन होईल.त्यानंतर Chief Electoral Officer,Maharashtra या पहिल्या लिंक वर क्लिक करा.
- लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही Download Electoral Roll PDF या पर्यायावर क्लिक करा.
PDF Voter list download
- आता तुम्हाला प्रथम आपले राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर आपल्याला नवीन https://ceo.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती घेऊन जाईल.
- येथे आल्यानंतर Home या टॅब च्या सामोर PDF Electoral Roll (Part wise) हा पर्याय पाहायला मिळेल.या वरती क्लिक करायचे आहे.
- या वेबसाईटवरील Go to New Website या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.
- या पेजवरील निवडणूक यादी (matdar yadi) विभागनिहाय PDF या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर मतदार यादी डाऊनलोड (electoral roll) करण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा,विधानसभा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
- आता Capcha code टाकायचा आहे म्हणजे खालील रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरे जसेच्या तसे तुम्हाला येथेथे टाकायची आहे.
- त्यानंतर Open PDF यावर क्लिक केले असता आपल्या समोर गावाची मतदार यादी PDF Voter list download स्वरुपात open होईल.