Close Visit Mhshetkari

UPI Payment : UPI द्वारे पेमेंट करताना ‘या’ बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे नाहीतर काहीच वेळात तुमचे अकाउंट होईल रिकामे

UPI Payment : आजचा युगामध्ये दुधापासून भाजीपाला अगदी किराणा सामाना पर्यंत सर्व ठिकाणी यूपीआय चा वापर केला जातो देशात यूपीआय वापरण्याची संख्या वाढत चालली आहे तुम्हाला माहितीच असतील की phone pay BHIM इतर ॲप उपयोग द्वारे काही सेकंदात सहजच पैसे या खात्यातून दुसऱ्या खात्यात किंवा ऑनलाईन व्यवहार केले जातात तुम्हाला रक्कम जवळ बाळगण्याची काही गरज नाही.

जेवढा ऑनलाईन पेमेंटचा वापर वाढला आहे तेवढ्याच अनेक फसवणूक च्या तक्रारी देखील वाढत आहे. ऑनलाइनच्या जमान्यात ऑनलाइन पेमेंट करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे .तुमच्याकडून एक छोटीशी चूक झाली. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावी लागते.

स्क्रीन लॉक करून ठेवा

आज जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये स्क्रीन लॉकची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमची स्क्रीन लॉक करावी. हे तुमच्या सर्व अ‍ॅपच्या सुरक्षिततेसह तुमचे पेमेंट सुरक्षित करते. जर तुम्ही तुमच्या फोनची स्क्रीन लॉक केली नाही तर कोणीही तुमचा फोन सहज हॅक होऊ शकतो. तुमचा फोन आणि तुमचे UPI अ‍ॅप्स सुरक्षित करण्यासाठी स्क्रीन लॉक करणे खूप महत्त्वाचे आहे.

हे पण पहा --  Credit Card UPI link : युपीआय सोबत क्रेडिट कार्ड लिंक करणे कितपत योग्य आहे ? काय आहेत फायदे आणि तोटे ? पहा सविस्तर ..

UPI आयडी पडताळणी

केव्हाही तुम्ही कोणते यूपीआय पेमेंट करतात तेव्हा त्या अगोदर UPI-AD ची पडताळणी करावी पेमेंट करतेवेळी कधीही गरबड करू नयेकरू नये. तुम्ही जर घाई मध्ये पेमेंट केले तर चुकीच्या UPI आयडीवरही नकळत जाऊ शकते अशा वेळेस तुम्ही UPI आयडी परत चेक करावा.

एका पेक्षा जास्त ॲप वापरणे टाळावे

बऱ्याचदाराचे होते की अनेक जण ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एकापेक्षा जास्त UPI अ‍ॅप चा वापर करत असतात एकापेक्षा जास्त UPI अ‍ॅप्स असल्यामुळे आपला गोंधळ उडून जातो अशा परिस्थितीत UPI पेमेंटसाठी नेहमी एकच अ‍ॅप वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कधीही कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

Leave a Comment