Union Budget 2023 : सरकारी कर्मचाऱ्यांनी आनंदाची बातमी समोर आली असून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मध्ये पगारवाढीचा निर्णय हमखास होणार आहे.
8th pay commission news
कर्मचारी संघटनांचा वाढता दबाव आणि पुढील वर्षीच्या निवडणूका यामुळे सरकारी कर्मचारी वर्गाला खुश करण्यासाठी विविध निर्णय होऊ शकतात.असा अंदाज तज्ज्ञांनी काढला आहे.
केंद्र सरकारने यापूर्वीच आठव्या वेतन आयोगाला नकार दिला आहे.परंतु, कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्यममार्ग काढला जाऊ शकतो.कनिष्ठ पदांवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मागणी या निर्णयाने निकाली निघू शकते.
8 वा वेतन आयोगाला मुहुर्त कधी?
8 व्या वेतन आयोगाला आता मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.
Government employees
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 % असून एका उदाहरणाने हे समजून घ्यायचे झाले तर पुढील उदाहरण पहा.जर एखाद्या व्यक्तीला 15,500 रुपये किमान वेतन आहे,तर त्याचे एकूण वेतन 15,500×2.57 म्हणजे 39,835 रुपये होईल.सहाव्या CPC मध्ये फिटमेंट रेशो 1.86 % ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढणार
कर्मचारी संघटनेकडून फिटमेंट फॅक्टर वाढवून तो 3.68 % करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे.यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन जर 18,000 असेल तर 26,000 रुपये होईल.
कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात गृह कर्ज
सरकारी कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी केंद्र सरकार हाऊस बिल्डिंग अलाऊन्स (HBA) देत असते.हे एक प्रकारची ॲडव्हास,आगाऊ रक्कम असते,त्यासाठी केंद्र सरकार 7.1 % व्याज दर वसूल करते,हा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.तर तज्ज्ञांच्या मते हा व्याजदर वधारले आणि 7.5 टक्के होईल.