Close Visit Mhshetkari

tractor subsidy : 90% अनुदानावर ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र सुरु,लगेच करा अर्ज

tractor subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो बैलांसाठी केला जाणारा खर्च आता शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळे लोक आधुनिक शेती किंवा यांत्रिकीकरणाकडे वळत आहेत.कारण शेतकऱ्यांकडे शेती ही कमी उरलेली आहे कारण शेतीचे तुकडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे आता सोपे जात आहेआता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मिनी ट्रॅक्टर साठी शेतकऱ्यांना 90 % अनुदान भेटणार आहे.त्यासाठी कसा व कुठे अर्ज करायचा आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत.

Mini Tractor Yojana Maharashtra

शेतकऱ्यांकडे शेती ही कमी उरलेली आहे कारण शेतीचे तुकडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे आता सोपे जात आहे.ट्रॅक्टर खरेदी करिता केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात.एक योजना म्हणजे मिनी ट्रॅक्टर योजना.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ३ लाख १५ हजार रुपये अनुदान दिले जाते.ही योजना सध्या परभणी जिल्ह्यामध्ये सुरू झाली.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

मित्रांनो जे शेतकरी परभणी जिल्ह्यातील आहेत. आणि ते अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील आहेत,अश्या घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ही या  अंतर्गत पुरविण्यात येत आहे.या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र करिता 90% अनुदान हे शासन देत आहे.

हे पण पहा --  Solar Rooftop yojana : आता घरावर बसवा 40% अनुदानवर सोलर पॅनल,'या' गावांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Mini Tractor Subsidy

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत

मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे

खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. बँक पासबुक

2. बचत गटाचे घटना पत्र

3. बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी

4. बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला

5. कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र

6. आधार कार्ड, पॅन कार्ड

ट्रॅक्टर अनुदान योजना साठी येथे अर्ज करा

Tractor subsidy

Leave a Comment