Tan Nashak Favarni |
खरिप हंगामातील पिकांसाठी तणनाशक
खरिप हंगामातील पिकांसाठी तणनाशक”पिकाचे नाव वापरावयाच्या तणनाशकाचे शास्त्रीय नाव तणनाशकाचे प्रमाण प्रती १० लीटर पाण्याकरिता तणनाशकामुळे नियंत्रित होणारे तणांचे प्रकार तणनाशक वापरण्याची पद्धत खालील प्रमाणे आहेत.
भात तणनाशक (Rise Herbicides)
•• पेंडीमिथॅलीन ३० ईसी- ५० मिली- रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत
प्रेटिलॅक्लोर ३० इ डब्ल्यू अधिक पायरॅझोसल्फुरॉन इथाईल -५०-६० मिली- उगवणपुर्व पेरीव भातासाठी
•• अझीमसल्फुरॉन ५० इसी- २ ते ३ ग्रॅम- रोवणी तसेच पेरीव भात पिकात लागवडीनंतर २५ दिवसांनी उगवण पश्चात फवारणी. ३०० लीटर पाणी प्रति हेक्टर
•• बिसपायरीबॅक सोडीयम १० एससी ६ ते ७ मिली- रोपवाटीकेत १०-१२ दिवसांनी उगवण पश्चात किंवा रोवणीनंतर १०-१५ दिवसांनी फवारणी
•• इथॉक्सोसल्फुरॉन १५ टक्के डब्ल्यूडीसी- १.६६ ते २ ग्रॅम- उगवण पश्चात
•• पायरॅझोसल्फुरॉन इथाईल १० इडब्ल्यू- २ ते ग्रॅम- रोवणीनंतर ४ ते ७ दिवसांत उगवण पश्चात
•• मेटसल्फ्युरॉन मिथाईल १० टक्के + क्लोरीम्युरॉन इथाईल १० डब्ल्यूपी -०.३५ ग्रॅम- उगवणपूर्व रोवणीनंतर ३ दिवसांपर्यंत फवारणी
मका तणनाशक (Corn /Meaz Herbicides)
>> ॲट्रॉझीन ५० डब्ल्यूपी- १५-३० ग्रॅ. उगवणपूर्व
टेम्बोट्रायॉन ३४.४ एससी- ६ मिली- उगवण पश्चात- पीक ३०-४० दिवसांचे असताना
>> टोप्रामेझॉन ३३.६ एससी- १.५ मिली- उगवण पश्चात- पीक ३०-४० दिवसांचे असताना
>> हॅलोसल्फुरॉन मिथाईल ७५ टक्के डब्ल्यूपी- २.४ ग्रॅम- उगवणपश्चात- पेरणीनंतर २५-३० दिवसांनी
सोयाबीन तणनाशक (Soybean Herbicides)
•• पेंडीमिथॅलीन ३८.७ सीएस- २० ते ३५ मिली- उगवणपूर्व
•• डायफ्लोसुलम ८४ टक्के डब्ल्यूडीजी- ०.४२ ग्रॅम- उगवणपूर्व, फक्त सोयाबीन सलग पिकात
•• सल्फेक्ट्राझॉन ३९.६ टक्के- डब्ल्यूएससी- १५ मिली- उगवणीपूर्व
•• पेंडीमिथॅलीन ३० अधिक इमॅझीथायपर २ टक्के इसी- ५० ते ६० मिली- उगवणीपूर्व
•• इमॅझीथायपर १० टक्के डब्ल्यूएसएल- १५ ते २० मिली- उगवणीपूर्व किंवा सलग पिकात उगवण पश्चात. पीक १५ ते २० दिवसांचे असताना द्रावणात अमोनियम सल्फेट व प्रसारकद्रव्य योग्य मात्रेत व योग्य प्रमाणात मिसळून फवारावे
•• इमॅझीथायपर अधिक इमॅओमॉक्स ७० डब्ल्यूजी-२ ग्रॅम- उगवणपश्चात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना- किंवा तण २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मिली प्रति लीटर पाणी + २ ग्रॅम अमोनियम सल्फेट.
•• क्लोरीम्युरॉन इथाईल २५ डब्ल्यूपी- ०.८ ग्रॅम- उगवणीपश्चात- पीक १० ते २० दिवसांचे असताना प्रसारक द्रव्य मिसळून घ्यावे.
•• क्विझॅलोफॉप पी ईथाईल ५ इसी- २० मिली- उगवणीपश्चात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्य १० मिली प्रति लीटर पाण्यात मिसळावे.
•• प्रोपॅक्विझाफॉप १० इसी-१५ मिली- उगवणपश्चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना
•• प्रोपॅक्विझाफॉप २.५ टक्के अधिक इमॅझीथायपर ३.७५ टक्के डब्ल्यू डब्ल्यूएम इ- ४० मिली- उगवणपश्चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना
•• सोडियम ॲसिफ्लोरोफेन १६.५ टक्के अधिक क्लोडोनीफोप प्रोपॅजील १० इसी- २० मिली- उगवणपश्चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना.
भुईमूग तणनाशक (Groundnut Herbicides)
>> इमॅथीथॅपायर १० टक्के एस एल- २० ते ३० मिलि – उगवणपूर्व तसेच सलग पिकात उगवणीपश्चात.
>> इमॅथीथॅपायर ३५ टक्के अधिक इमॅझामॉक्स ३५ टक्के- २ ग्रॅम – उगवणीपश्चात पीक १५ ते २० दिवसाचे असताना किंवा तण २-३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी. द्रावणात स्टिकर १.५ मिलि/ लिटर पाणी, २० ग्रॅम अमोनियम सल्फेट.
>> क्विझूलोफॉप पी ईथाईल ५ टक्के ईसी – १५ ते २० मिलि – पीक १५ ते २० दिवसाचे असताना द्रावणात ०.०५०० अमोनियम सल्फेट आणि स्टिकर मिसळून फवारणी.
उडीद तणनाशक (Blackgram Herbicides)
•• फिनॉक्झीप्रॉप पी ईथील १९.३ टक्के डब्ल्यु डब्ल्यु ई सी – १२.५ ते १५ मिलि – उगवणीपश्चात पीक १५-२० दिवसाचे असताना फवारणी. त्यानंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
•• प्रोपॅक्विझाकॉप १० टक्के ईसी – १५ मिलि – उगवणीपश्चात, उभ्या पीक १५ ते २० दिवसाचे असताना.
•• क्विझॉलॉफॉप पी ईथाइल ५ टक्के ईसी – २० मिलि- उगवणीपश्चात, पीक १५ ते २० दिवसाचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.
तूर तणनाशक (Pigeon pea Herbicides)
• पेंडीमेथॅलीन ३० टक्के ईसी – ३५ ते ५० मिलि – उगवणीपूर्व
कपाशी तणनाशक (Cotton Herbicides)
>>पेंडीमेथॅलीन ३८.७ टक्के सी एस – २०-२५ मिलि – उगवणीपूर्व
>> डायुरॉन ८० टक्के डब्ल्यू.पी.- २०-३० मिलि- उगवणीपूर्व
>> पयरीथीओबॅक सोडीयम १० टक्के ईसी- १२.५-१५ मिलि- उगवणीपूर्व
>> क्विझॉलोफॉप ईथाईल ५ टक्के ईसी- २० मिलि- उगवणीपश्चात, पीक २० ते ३० दिवसाचे असताना,फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये.
>> फिनॉक्झिप्रॉफ पी इथील ९.३ टक्के डब्ल्यू डब्ल्यू ईसी – १५ मिलि- उगवणीपश्चात उभ्या पिकात तृणवर्गीय तणे ३० ते ४० दिवसांची असताना. फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात स्टिकर १० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळावे.
>> ग्युफोसिनेट अमोनियम १३.५ टक्के- ५० ते ६० मिलि- उगवणीपश्चात
>> पयरीथीओ बॅक सोडियम ६ टक्के ईसी अधिक क्विझॅनोफॉप इथील ४ टक्के ईसी- २५ मिलि- उगवणी पश्चात उभ्या पिकात. पीक २० ते ३० दिवसांचे असताना फवारणी.
ऊस तणनाशक (Sugarcane Herbicides)
>> सलफेक्ट्राझॉन ३९.६ टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस.सी.- ३० मिलि- उगवणीपूर्व
>> हॅलोसल्फुरॉन मिथील ३८ टक्के डब्ल्यू पी- १.६ ते १.८ मिलि- उगवणी पश्चात, लव्हाळा तणाचे प्रभावी नियंत्रण.
>> मेटासल्फुरॉन मिथील ३० टक्के डब्ल्यू.पी.- ०.६ ग्रॅम- उगवणीपश्चात ३० ते ४० दिवस, रूंद पानांच्या तणांसाठी.
कांदा तणनाशक (Onion Herbicides)
>> पेंडीमेथेलिन ३८.७ टक्के सीएस- २५ मि.लि- रोवणीनंतर २ ते ३ दिवसात तण उगवणीपूर्व.
>> ऑक्सीक्लुर फेन २३.५ टक्के ईसी – ८ ते १२ मिलि- उगवणी पश्चात, रोवणीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकात फवारणी. रूंद पानी तणांचे प्रभावी, अरूंद पानी तणांचे काही अंशी नियंत्रण.
>> प्रोप्याक्विझाफॉप १० टक्के ईसी- १२.६ मिलि- उगवणीपश्चात उभ्या पिकात, पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणी.
>> क्विझॅलोफॉप ईथाईल ५ टक्के ईसी- १५ ते २० मिलि- उगवणी पश्चात पीक १५ ते २० दिवसांचे असताना फवारणी.
>> प्रोपॅक्विझॅफोप ५ टक्के अधिक ऑक्सिफ्लोरफेन १२ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू- १८ ते २० मिलि- उगवणीपश्चात, रोवणीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकात फवारणी. रुंद व अरुंद पानी तणांचे प्रभावी नियंत्रण.
रब्बी हंगामातील पिकांसाठी तणनाशक
‘रब्बी हंगामातील पिकांसाठी तणनाशक’ पिकाचे नाव वापरावयाच्या तणनाशकाचे शास्त्रीय नाव तणनाशकाचे प्रमाण प्रती १० लीटर पाण्याकरिता तणनाशकामुळे नियंत्रित होणारे तणांचे प्रकार तणनाशक वापरण्याची पद्धत खालील प्रमाणे आहेत.
१) रब्बी ज्वारी तणनाशक (Jawar Herbicides)
>> ॲट्राझीन – ५० टक्के डब्लू.पी. ४० ते ८० ग्रॅम सर्व प्रकारची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
>> ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ८० ते १०० मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे
>> २-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी. २५ ते ३६ ग्रॅम वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवडयानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
२) मका तणनाशक (Meaz/corn Herbicides)
•• ॲट्राझीन ५० टक्के डब्लू पी. ४० ते ८० ग्रॅम सर्व प्रकारची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
•• ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ८0 ते १00 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
•• २-४-डी सोडिअम ८० टक्के डब्लू पी. २५ ते ३६ ग्रॅम वार्षिक व बहुवार्षिक रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ ते ४ आठवडयानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
३) गहू तणनाशक (wheat Herbicides)
>> पेंडोमिथिलीन ३० टक्के ई.सी. ७0 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी
>> मेथॉबॅथीझुरॉन ७० टक्के डब्लू पी. २१ ते २८ ग्रॅम जंगली ओट, केना गवत,रुंद पानाची तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
>> २-४-डी डायमेथील अमाईन क्षार ५८ टक्के ई.सी. १७ ते २० मि.ली. सर्व रुंद पानाची तणे हे तणनाशक गव्हाच्या वाढीच्या अवस्थेशी संवेदनशील असल्यामुळे याची फवारणी जास्तीत जास्त फुटव्याच्या अवस्थेत करावी. वेळेवर पेरणीच्या गव्हाच्या पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी उशिरा पेरणीच्या गव्हाच्या ४५ ते ५० दिवसांनी करावी.
>> २-४-डी इथील इस्टर २६ ते ४४ मि.ली. ३८ टक्के ई.सी.
>> २-४-डी सोडियम क्षार ८० टक्के डब्लू.पी. १२ ते २५ ग्रॅम
मेट्रीब्यूझिन ७० टक्के डब्लू. पी. ५ ते ६ ग्रॅम जंगली ओट, केना गवत,रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
हे पण पहा नवीन शेत रस्त्यासाठी कसा आणि कुठे करावा अर्ज
>> मेटसल्फ्युरॉन मेथाइल २० टक्के डब्लू.पी. २.५ ग्रॅम रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३० ते ५० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
४) हरभरा, मसूर व वाटाणा तणनाशक
•• पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० ते ८० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी व पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
•• ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८ ते १० मि. ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
५) भुईमुग तणनाशक (Groundnut Herbicides)
>> ऑक्सिफ्लोरफेन २३.५ टक्के ई.सी. ८.५ ते १७ मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
>> पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पेरणीनंतर ३ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी. व ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
>> इझामेथापर १० टक्के एस.एल. १५ ते २० मि. ली. काही रुंद व अरुंद पानाची तणे पेरणीनंतर २० दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
६) सुर्यफुल तणनाशक (Sunflower Herbicides)
•• पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ७० मि.ली. रुंद पानाची व वार्षिक गवतवर्गीय तणे पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
७) बटाटा तणनाशक (Potato Herbicides)
>> पेंडीमेथिलीन ३० टक्के ई.सी. ५० ते ६० मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे. लावणीनंतर ३० दिवसांनी खुरपणी करावी.
>> ऑलाक्लोर ५० टक्के ई.सी. ७५ मि. ली. गवतवर्गीय व रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर पीक व तणे उगवण्यापूर्वी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
>> क्युझालोफोप इथाइल ५ टक्के ई.सी. १० ते १५ मि.ली. गवतवर्गीय तणे बटाटा लावणीनंतर २० ते २५ दिवसांनी हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
>> मेट्रीब्यूझिन ७० टक्के डब्लू. पी. १५ ते २० ग्रॅम गवतवर्गीय रुंद पानाची तणे बटाटा लावणीनंतर ३ ते ४ दिवसांनी किंवा बटाटा पिकाची उंची ५ सें.मी. झाल्यानंतर हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
टिप– शेतकरी मित्रांनो वरील उत्पादनाचा वापर करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशकांची,टॉनिक,किटकनाशकची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.
हे पण पहा 100% अनूदानावर बसवा घरावर सोलर पॅनल