Close Visit Mhshetkari

Soybean crop session : सोयाबीन बाजारभाव टिकून राहिल का? सध्या काय आहे जागतिक स्थिती आणि ताजे बाजारभाव

Soyabean rate : सध्या सोयाबीन बाजारभाव साडेचार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत.30 ऑगस्टला 7 हजार 200 रुपये होते.पण मागीलवर्षी याच काळात सोयाबीनला सरासरी 8 हजार 264 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता.आता नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर सध्याचे भाव असेच राहतील का ? सोयाबीन बाजारभाव वाढतील का कमी होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याविषयी तज्ञ काय म्हणतात पाहूया.

सोयाबीन बाजारभावावर परिणाम करणारे घटक

जगातील विविध देशांमधील सोयाबीनचे उत्पादन,चीनसारख्या मोठ्या खरेदीदार देशाकडून होणारी या सोयाबीनची आयात‍, सोयाबीनची उत्पादकता,सोयाबीन पेंडीची मागणी अशा अनेक घटकांवर सोयाबीनचे भाव ठरत असतात.सोयाबीन प्रक्रिया उद्योग सध्या उत्पादकता

अर्थतज्‍ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

देशात सोयाबीन व पाम तेलाची होणारी आयात आणि सोयापेंडीच्या विक्रीच्या दरावरून सोयाबीनचा भाव ठरला जातो.सध्या आपल्या देशातून 550 डॉलर प्रतिटन या दराने सोयापेंडीची निर्यात सुरू आहे.त्यामुळे सोयाबीनला 5 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो,असा तज्‍ज्ञांचा दावा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये सोयाबीनला सरासरी 8 हजार 264 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता.

महाराष्ट्रातील सोयाबीनची स्थिती

महाराष्ट्रात सोयाबीन पिकांखालील लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या कृषी सांख्यिकी विभागाने बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार,महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 46.01 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती.म्हणजे यंदा त्यात तब्बल 2 लाख हेक्टरने वाढ झाली आहे.यावर्षी राज्यात सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्र 48.76 लाख हेक्टर एवढे आहे.गेल्या वर्षी 39.37 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.

हे पण पहा --  Soyabean spray : सोयाबीन पीकावर पहिली फवारणी कोणती करावी? सोयाबीन पिवळे पडले तर करा हा उपाय..

सोयाबीन उत्पादनची जागतिक परिस्थिती

सध्या इतर देशात सोयाबीनच्या काढणीने वेग घेतला आहे.या सोयाबीन उत्पादक देशात काही ठिकाणी कोरडा दुष्काळ तर काही भागात अतिपावसाचा सोयाबीन पिकांना फटका बसला, बाजारात सोयाबीन भावात काहीसा चढ-उतार सुरू आहे.चीन‍ आणि इतर देशांची मागणी वाढल्यास सोयाबीनला चांगला भाव मिळेल.त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी घसरण होणार नाही,अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव

सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव अपडेट नुसार सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव 7800 रुपयांचा मिळाला आहे.

सोयाबीनचा सर्वाधिक बाजारभाव भाव वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे.आज वडूज बाजार समितीमध्ये 15 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली होती आणि यासाठी किमान बाजारभाव 7 हजार 400 कमाल बाजारभाव 7 हजार 800 आणि सर्वसाधारण भाव 7 हजार 450 रुपये इतका राहिला.

  • गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 200
  • वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 270 रुपये
  • लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 325 रुपये
  • उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 400
  • मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 36
  • आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 111
  • धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार 100
  • वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार कमाल भाव मिळत आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment