Close Visit Mhshetkari

Soil Health Card : भरघोस उत्पादनासाठी कशी घ्यावी शेतीची काळजी? असे काढा फ्री जमीन हेल्थ कार्ड

Soil Health Card  : रकार शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी अनेक योजना राबवत असतात त्यापैकी ही एक अशी योजना आहे की शेतकरी आपल्या शेतातून चांगल्यापैकी उत्पादन मिळू शकते.

चांगले उत्पादन मिळवण्याकरता सॉइल हेल्थ कार्ड योजना सरकार शेतकऱ्यांसाठी घेऊन आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून अहवालाच्या आधारे आपली सुधारित शेती करू शकतात त्यामुळे त्यांचा खर्च कमी होऊ शकतो व उत्पादनही चांगली मिळू शकते.

माती परीक्षण कसे तपासायचे 

माती परीक्षणातून शेतकऱ्यांना निश्चितच निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होणार असून शेतकऱ्यांच्या शेतातील माती तपासण्यासाठी प्रयोगशाळा तयार करण्यात आले आहेत.

जिथे शास्त्रज्ञ मातीचे परीक्षण करून त्यातील गुणदोषाची माहिती तयार करून त्या मातीमध्ये काय गुण व काय दोष आहेत. याचे परीक्षण करून त्या मातीशी संबंधित योग्य माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या माहितीच्या आधारे शेतकरी आपली सुधारित शेती करू शकतात मृदा आरोग्य कार्ड अंतर्गत शेती करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते . शिवाय जमिनीचा समतोल देखील राखता येतो.

 मृदा कार्ड मिळविण्यासाठी खालील बाबी?

  • मृदा आरोग्य कार्ड मिळविण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट soilhealth.dac.gov.in वर जावे. 
  •  होम पेजवर आवश्यक माहिती भरा नतर लॉगिन करा. आता पेज उघडल्यावर राज्य निवडा. 
  • जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला Register New User चा पर्याय निवडावा लागेल. 
  • अर्जात विचारलेले सर्व तपशील बरोबर टाका. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. 
  • याशिवाय helpdesk-soil@gov.in वर ई-मेलही पाठवता येईल.
  • शेतकऱ्याला आपल्या शेतातील जमिनी त पोषक तत्वाची कमतरता काय आहे हे माहिती हे या योजनेमुळे माहिती होते.
  • या योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकते.
  • या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय शेतकरी आपल्या शेताची चाचणी घेऊ शकतो.
  • या योजनेमुळे शेतात कोणते पीक घ्यायचे व त्या पिकाला किती पाणी द्यायचे हे देखील माहिती होते.
  • मृदा कार्ड बनवल्यानंतर शेतकऱ्याला जमिनीचे आरोग्य उत्पादन क्षमता जमिनीचा दर्जा आणि जमिनीची कमकुवतता सुधारण्याच्या मार्गाची माहिती देखील या कार्डमुळे शेतकऱ्याला मिळते.

Leave a Comment