Smart meter : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गावाचा आणि शहराचा जसजसा विस्तार झाला, तसतसा विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. वीज चोरी, विजेची कमतरता, त्याचबरोबर ,गळती ,थकीत विज बिल यामुळे महावितरणाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असतो. परिणामी लोड शेडिंग चे प्रमाण सुद्धा वाढलेले आपण पाहिलेले आहे.
सध्याच्या फिडरवरील ट्रान्सफॉर्मरवर (डीपी) क्षमतेपेक्षा अधिक लोड झाल्याने सतत वीज खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शेती व गावांची लाईन स्वतंत्र केली जाणार आहे.
Smart prepaid meter scheme
मित्रांनो केंद्र सरकारच्या सुधारित वीज वितरण प्रणाली द्वारे आता राज्यात नवीन स्मार्ट मीटर किंवा प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर साडेसात हजार डीपी ची क्षमता वाढवली जाणार आहे तसेच शेतीचा लोड दिवसेंदिवस वाढत असताना कुटुंबाची संख्या सुद्धा वाढत आहे.
शेतीचा लोड दिवसेंदिवस वाढत असून गावातील कुटुंबाची संख्या देखील वाढत आहे.त्यामुळे सध्याच्या ट्रान्सफॉर्मवरील लोड क्षमतेपेक्षा अधिक झाल्याने सतत वीज खंडित होण्याची समस्या उद्भवत आहे.
सुधारित वीज वितरण प्रणाली
शेतकरी सोडून सर्वांनाच प्रिपेड मीटर ‘सुधारित वीज वितरण प्रणाली’तून राज्यात युद्धपातळीवर कामे सुरु आहेत. सुरवातीला शेती व गावांची लाईन स्वतंत्र करण्याचे काम पूर्ण झाल्यावर सर्व ग्राहकांना प्रिपेड मीटर बसविले जाणार आहे.पाच वर्षांत नागरिकांना विनाखंडीत वीज मिळेल असे ‘महावितरण’चे नियोजन आहे.
राज्यातील सुमारे अडीच कोटी ग्राहकांना हे वीज मीटर बसविले जाणार असून शेती पंपांना मात्र प्रीपेड मीटर बसवले जाणार नाहीत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांनी जेवढे पैसे भरले तेवढे वीज मिळणार आहे त्यामुळे थकबाकीचे प्रमाण कमी होईल असा विश्वास वीज कंपनी व प्रशासनाला वाटत आहे.
सदरील योजनेच्या माध्यमातून शेती व गावकऱ्यांच्या वीस पुरवठा लवकरच स्वतंत्र पणे केंद्र सरकारच्या नवीन वीज प्रणाली द्वारे शेती व इतर ग्राहकांची विजेची लाईन स्वतंत्र करण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे ओव्हरलोडेड ट्रान्स्फॉर्मरची क्षमता देखील वाढविण्यात येणार आहे.
त्यानंतर प्रिपेड मीटर बसविले जातील.
नवीन वीज प्रणालीतून कामे पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबणार असून, दुसरीकडे सौर ऊर्जेतून सुद्धा शेतकऱ्यांना वीज पंप वाटप योजना सुरू होणार आहे.असं महावितरण सोलापूर कार्यकारी अभियंता रमेश राठोड यांनी सांगितला आहे.