Close Visit Mhshetkari

Sharad Pawar Inspire Fellowship शरद पवार इन्स्पायर फेलोशिप,रुपये एक लाख अनुदानासाठी लगेच करा अर्ज

Sharad Pawar Inspire Fellowship : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहवचंद्र दर्शननिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील तरुणांना संधी कृषी साहित्य आणि शिक्षण यासाठी 12 ऑक्टोंबर अर्ज पाठवता येणार आहेत.

Sharad Pawar Inspire Fellowship
Sharad Pawar Inspire Fellowship

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप

 कृषी, शिक्षण आणि साहित्य (Agriculture, Education and Literature) क्षेत्रात संशोधन करू इच्छिणाऱ्यांकडून या फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.याअंतर्गत कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर  साहित्य क्षेत्रासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर आणि शिक्षण क्षेत्रासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन यासाठी गुणवंतांना अर्ज करता येतील.

फेलोशिप अंतर्गत ‘शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’साठी ८०, ‘शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशिप’साठी १० आणि ‘शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिप’साठी ४० अशा एकूण १३० जणांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेने दिली आहे.महाराष्ट्रातील होतकरू,गुणवंत आणि नव्याने काही करू पाहणाऱ्या तरुण- तरुणींना संधीचे नवे अवकाश खुले करुन देण्यासाठी ही फेलोशिप देण्यात येते.

बदल घडवून आणणारे शेती,औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत,परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली,विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले.आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत.त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.

वेग,अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. वातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती, हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत.या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषतःविद्याथ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या आव्हानानाबद्दल संधीबद्दल सविस्तर विवेचन ‘परिशिष्ट मध्ये दिले आहे.

Sharad Pawar Inspire Fellowship Mahiti

शिक्षण उद्यासाठी असते,उद्याचे सुजाण,सतर्क,सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खन्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते.शिकावे कसे शिकण्याचा आनंद कसा घ्यावा धावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण शिकता शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते. उद्याच्या संधीचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची यादृष्टीने नितांत आवश्यकता आहे. कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये या आव्हानांच्या अनुषंगाने अनेक शिफारशी केल्या आहेत आणि कार्यक्रमही सुचवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या धोरणाच्या अमलबजावणीसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम ( SARTHAQ भाग १ आणि २), तसेच निपुण भारत अभियान हे दस्तऐवज वाचा, भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने मूल्यशिक्षण, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर विविध विषयाचा परस्परांशी आणि कला व खेळ यांच्याशी समन्वय,बहुवर्ग अध्यापन, वाचताना वाचनाचा वेग आणि आकलन वाढवण्यासाठी घेतलेले उपक्रम,पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग शाळेची इमारत आणि परिसर याचा शैक्षणिक साधन म्हणून वापर,अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर असे अनेक उपक्रम आयोजित करता येतील.

ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत,तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल.”शरद पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण

Sharad Pawar Inspire Fellowship Online Application Form

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप संबधात काही महत्वाच्या सूचना

१) ही फेलोशिप फक्त शिक्षकांसाठीच असेल.

२) कोणत्याही व्यवस्थापनाने चालवलेल्या मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक यामध्ये सहभागी होऊ शकतील.

३) यापूर्वी कोणत्याही संस्थेला सादर केलेला प्रकल्प या फेलोशिपसाठी सादर करू नये.

४) इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

५) ज्या शिक्षकाना ऑनलाइन अर्ज करणे अडचणीचे होत असेल अशा शिक्षकांनी प्रथमतः खाली दिलेल्या वेबसाईटवर https://apply.sharadpawarfellowship.com ऑनलाइन नोंदणी करावी आणि सोबत दिलेला अर्ज (हार्ड कॉपी) भरून, यशवंतराव चव्हाण सेंटर, जन, जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉइंट मुंबई ४०००२१ या पत्त्यावर पाठवावे.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मराठी माहिती

परिशिष्ठमध्ये अंतर्भूत केलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत,नियमित अध्यापन करत विद्यार्थ्याच्या सहभागाने चालणारे व शैक्षणिक वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक अर्ज करण्यासाठी पात्र समजण्यात येतील, तसेच २०२२-२३ वा शैक्षणिक वर्षांत बदली न होणारे शिक्षकानी अर्ज करावा.

>> फेलोशिपची संख्या – २० प्राथमिक आणि २० माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक

>> अर्जदारांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असेल

>> निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक रुपये ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त) फेलोशिप असेल.यातील रुपये ४०,०००/- इतकी रक्कम शिक्षकाना प्रत्यक्षात

>> फेलोशिपमधील उपक्रमासाठी लागणारी साधने संभाव्य प्रवास, इत्यादीसाठी देण्यात येईल:

>> उर्वरित २०,०००/- इतकी रक्कम ही कार्यशाळा आणि मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनासाठी खर्च करण्यात येईल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment