Close Visit Mhshetkari

SBI Pashu Palan Loan : आता या योजनेअंतर्गत जनावर 60 हजार रुपये कर्ज! पहा पात्रता आणि येथे करा ऑनलाइन अर्ज!

SBI Pashu Palan Loan Yojana : पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत,शेतकऱ्यांना जनावरांच्या संख्येनुसार 40,000 ते 60,000 पर्यंत कर्ज दिले जाते. पात्रता,अर्ज प्रक्रिया,किती कर्ज उपलब्ध आहे,आवश्यक कागदपत्रे,योजनेची वैशिष्ट्ये याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. 

SBI Pashu Palan Loan Yojana

आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांकडे भांडवल नसल्यामुळे पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने पशुसंवर्धन कर्ज योजना सुरू केली आहे..
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना म्हैस,गाय किंवा इतर पाळीव दुभती जनावरे असल्यास बँकेकडून कर्ज घेता येते.स्टेट बँक ऑफ इंडिया पशुसंवर्धन कर्ज योजना 2022 अंतर्गत शेतकरी प्रति जनावर 60,000 रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

पशुसंवर्धन कर्ज योजना वैशिष्ट्ये

  1. शासनाने पशुपालन कर्ज योजना सुरू करून राज्यातील नागरिकांना स्वत:चा रोजगार सुरू करता येईल.
  2. ज्या नागरिकांकडे जनावरे आहेत ते या योजनेत कर्ज घेऊ शकतात.
  3. जनावरांच्या व्यवसायाशी संबंधित असलेले नागरिकही या योजनेंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय वाढवू शकतात.
  4. पशुसंवर्धन कर्ज योजना सुरू झाल्याने देशात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

SBI Pashu Palan Loan Documents

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पशु कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना या सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे-

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्याचे पॅनकार्ड
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र
  • जनावरांच्या संख्येबाबत प्रतिज्ञापत्र
  • जमिनीची कागदपत्रे आणि जमीन करार
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment