SBI loan : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी अवघ्या एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.SBI बँकेने म्हटल्यानुसार,रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Xpress Credit)अंतर्गत कर्ज मिळार आहे.
sbi loan offer |
रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (RTXC)
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ने वैयक्तिक कर्ज देण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे.रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट Real नावाची ही सुविधा (YONO SBI ) ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच्या मदतीने बँकेचे ग्राहक घरी बसून 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतील आणि त्यांना बँकेत येण्याची गरज भासणार नाही.
एसबीआय पर्सनल लोन ही sbi बँकेची खास सुविधा असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे. बँकेचा मोठा ग्राहक वर्ग याचा फायदा घेत आहे. आता बँकेने काही ग्राहकांसाठी “रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. पगारदार ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणे हा या सुविधेचा उद्देश आहे.
Paperless personal loan
द्वारे ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. ही 100% पेपरलेस कर्ज प्रक्रिया असेल असे बँकेने म्हटले आहे.कर्ज सुलभतेसाठी पात्रता,क्रेडिट चेक,कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केल्या जातील.एसबीआयने म्हटले आहे की क्रेडिट चेक पात्रता,मंजुरी आणि दस्तऐवजीकरण आता रिअल टाइममध्ये डिजिटलपद्धतीने करण्यात येणार आहे.
RTXC loan Beneficiaries
SBI बँकेने म्हटल्यानुसार,रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Xpress Credit)अंतर्गत,केंद्र किंवा राज्य सरकार आणि बँकेत वेतन खाते असलेल्या ग्राहकांना यापुढे शाखेत जाऊन वैयक्तिक कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. एसबीआय रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिटवरील (RTXC) पर्सनल लोन फीचर पगारदार ग्राहकांना उपलब्ध आहे.ज्यांचे बँकेत वेतन खाते आहे, ते या कर्जासाठी पात्र आहे.
केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि नफा कमावणारे राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय प्रतिष्ठा असलेल्या शैक्षणिक संस्था, निवडलेले नगरसेवक, त्यांचे बँकेशी संबंध असोत वा नसोत. या सगळ्यांसोबत काम करणं महत्त्वाचं असल्याचं बँकेने स्पष्ट केले आहे.RTXC loan Beneficiaries