SBI Bank Rules : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवहाराशी संबंधित एक मेसेज व्हायरल होत आहे.तुमचेही SBI मध्ये बचत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
sbi bank rules |
State Bank of India Rules
SBI बॅंकेच्या व्यवहाराशी संबंधित एक मेसेज व्हायरल होत आहे.या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की,बचत खात्यात तुम्ही वर्षाला 40 व्यवहार करू शकता. 40 पेक्षा जास्त व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारावर खात्यात जमा केलेल्या रकमेतून 57.5 रुपये कट केले जातील.आणखी एका मेसेजमध्ये असेही सांगण्यात येत आहे की, एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास एकूण 173 रुपये कट केले जातील. मात्र पीआयबी फॅक्ट चेकवर सांगण्यात आले की, बँकेने असा कोणताही नियम केलेला नाही.(State Bank of India Rules)
SBI च्या नवीन नियमाचे दावे खोटे
PIB ने त्यांच्या फक्ट चेकमध्ये हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.PIB ने आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट केले की बँकेने असा कोणताही नियम केलेला नाही.ते म्हणाले की,हे सर्व दावे खोटे आहेत.बँकेने व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियम बदललेले नाहीत.’SBI च्या नवीन नियमाचे दावे खोटे’ आहेत.