Close Visit Mhshetkari

Save Money tricks : हातात पैसा टिकत नाही? पहा उपाय आणि करा फॉलो

SSave money tricks : हातात पैसा टिकत नाही,असे अनेकजण म्हणतात.आपण खर्च करताना विचार करत नाही आणि मग पैसा अपूरा पडतो.बरेचदा अनावश्यक खर्च करण्यामुळे पैशाची योग्य बचत होत नाही.मात्र पैशांची बचत करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत.

How To Save Money In Marathi

1) पैशांची बचत करण्यासाठी चैनीच्या वस्तू,हॉटेलिंग आदींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.पण याचा अर्थ गुणवत्तेशी तडजोड करू नका.चांगले अन्नधान्य,फळे,भाजीपाला यांच्या बाबतीत तडजोड करू नका.
2)अनावश्यक खर्च टाळा :- घरातील किराणा माल आणि अन्य वस्तूंचा खर्च केल्याावर वाचणारे पैसे लगेच वेगळे ठेवा.हवेतर यासाठी वेगळी पिगी बँक बनवा.
3) पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर :- घरचे एखादे महत्त्वाचे काम असो वा ऑफिसला जायचे असो,बाहेर जाताना कार ऐवजी शेअर ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा.काहीजणांना पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्यास काही कंपनीजकडून विशेष अलाऊन्ससुद्धा देतात.
4) आपत्कालीन निधी,आरोग्य विमा आणि मुदत विमा काढा.
5) गुंतवणूक करा : – मुदत ठेव, शेअर्स, म्युच्युअल फंड,गोल्ड ईटीएफ,पेन्शन योजना आदी वेगवेगळ्या पर्यायांबद्दल माहिती असली पाहिजे.

Save Moneys Tricks

6) इन्कम टॅक्स :- आर्थिक नियोजनात इन्कम टॅक्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्न, गुंतवणूक, घर आदींशी संबंधित वेगवेगळ्या करांची माहिती महिलांनी जाणून घ्यावी. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होते.(Save Moneys Tricks)
7) डेटा प्लॅन बदला :- मोबाईलवरील खर्च वाचवण्यासाठी स्वस्तातला कॉम्बो प्लॅन वापरा.तसेच पेमेंट एप्सचा वापर करून रिचार्ज करा म्हणजे तुम्हाला कॅशबॅक मिळेल.
8) पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा :- बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड (Credit card) वापरणे टाळा. शक्रेडिट कार्ड वापरल्याने गोष्टी त्या वेळी सोप्या होतात परंतु त्याचे मासिक पेमेंट वाढते.त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर कटाक्षाने टाळावा.

Ways to save money

10) दारू आणि सिगारेट : – मद्य आणि सिगारेट सेवनाचे व्यसन असेल तर सावध रहा.या सवयी आरोग्यासाठी घातक आहेतच शिवाय अधिक खर्चिकदेखील आहे.या सवयी नक्की टाळाव्यात.

11) व्हाउचर आणि सेलचा जास्तीत जास्त फायदा घ्या.
सेल मधल्या वस्तूंची क्वालिटी चांगली नसते,व्हाउचरचा काही उपयोग नसतो हा विचार करू नका.ह्या दोन गोष्टी बचतीसाठी तुम्हाला नेहमी मदत करतील.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment