Close Visit Mhshetkari

Sarvapitri Amavasya : जाणून घ्या सर्वपित्री अमावास्या मुहूर्त विधी आणि उपाय

Sarvapitri Amavasya : सर्वपित्री अमावस्याला महालय अमवस्या असे म्हटल्या जाते.महालय अमावस्येला पितरांचा आशीर्वाद आणि देवीच्या चरणांच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना यावेळी खूप फायदा होणार आहे. यावेळी ४ शुभ ग्रहांनी महालयाला एक संयोग घडवला आहे,पितृपक्षातपूर्वजांची पूजा विधी आणि पिदाडण केले जाते.पितृ पक्षात विधि केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात.

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे पितर करतात श्राद्ध

असे म्हणतात की ज्या लोकांना पितरांची मृत्यु तारीख माहित नाही,ते या दिवशी श्राद्ध करू शकतात.या दिवशी श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो.

वर्षभरात तसेच पितृपक्षात जे कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, ज्या मृतांची नक्की तिथी माहीत नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्व जण सर्व पीत्री अमवस्या ला श्राद्ध करतात.

सर्वपित्री अमावास्या महत्त्व

पूर्वज्यांच्या रूनाईतून मुक्त हण्यासाठी आपण श्राद्ध करत असतो तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जातेपितृपक्षातपूर्वजांची पूजा विधी आणि पिदाडण केले जाते.पितृ पक्षात विधि केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन  कुटुबा ला आशीर्वाद देतात.

सर्वपित्री अमावस्या २०२२ शुभ मुहूर्त

सर्वपित्री अमावस्या दिनांक: २५ सप्टेंबर २०२२, रविवार

सर्वपित्री अमावस्या सुरू: २५ सप्टेंबर २०२२, रविवार, सकाळी ०३. ११ मिनिटे

अमावस्या तिथी समाप्त: २६ सप्टेंबर २०२२, सोमवार, सकाळी (०३.२२ मिनिटे)

सर्वपित्री अमावास्या उपाय

१. पिंपळ वृक्षाची पूजा

ज्योतिष शास्त्रानुसार सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि ते समृद्धीचा आशीर्वाद देतात, असे मानले जाते.

२. तर्पण (पिंडदान) करणे

पितृ पक्षात तर्पण करता येत नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

३. दान करणे

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी चांदीचे दान करणे खूप शुभ मानले जाते.

४. ब्राह्मण भोजन देणे

सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने अन्नदान करा. मोकळ्या जागेत ठेवा. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.

वेगवेगळ्या अमावास्यांची नावे

• वैशाख अमावास्येला ‘भावुका अमावास्या’म्हणतात.
• अमावास्या सोमवारी आल्यास तिला ‘सोमवती अमावास्या’ म्हणतात.या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला १०८ वस्तू अर्पण करतात.
• आषाढातील अमावास्या ‘दिव्याची अमावास्या असते.या दिवशी दीपपूजन केले जाते.
• श्रावणातील अमावास्येस’पिठोरी अमावास्या’ म्हणतात.
• भाद्रपद अमावास्या ही ‘सर्वपित्री अमावास्या’ म्हणून मानली जाते.
• आश्विनातील अमावास्या ‘लक्ष्मीपूजनाची अमावास्या’ ही मंगलदायक मानली जाते.

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment