Close Visit Mhshetkari

Ration card scheme :  रेशन कार्ड असेल तर सरकारी योजनेतून कुटूंबातील मुलीना मिळणार १ लाख १ हजार रुपये

Ration card scheme :  नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि त्यामध्ये या रेशन कार्ड धारकांच्या मुलीसाठी ही योजना राबवण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आले आहे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींचा सक्षमीकरण साठी लेक लाडकी योजना सुरू केलेली असून संबंधित योजनेसाठी आता निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदरील योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सखोल चर्चा झालेली आहे.

केसरी राशन कार्ड धारकातील कुठून धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये त्यानंतर इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये सावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये अशा रीतीने एकूण मुलींना 1 लाख 1 हजार रुपये सरकारतर्फे देण्यात येणार आहे.

Ration card scheme Maharashtra

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राविण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

हे पण पहा --  Bhagyashree yojana : तुम्हाला एक मुलगी असेल तर मिळतील 50 हजार रुपये,लगेच असा अर्ज करा

दिनांक १ एप्रिल २०२३ पासून कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा जुळ्या २ मुलींना त्याच प्रमाणे जुळ्या १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

सदरील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक आहे.१ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लेक लाडकी योजना लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Leave a Comment