Ration card online : आज प्रत्येक ठिकाणी रेशन कार्डची गरज लागते. अनेकवेळा रेशन कार्डमध्ये तुमचे नाव नसेल तर काही कामांचा खोळंबा होतो.रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव असते. तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या नावाचा देखील समावेश करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची देखील गरज नाही. तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस करू शकता. याविषयी जाणून घेऊया.
Ration card Online |
Ration Card Update online
लहान मुलांचे नाव जोडण्यासाठी (Ration Card Update online) साठी आवश्यक कागदपत्रे
>> कुटुंबातील सदस्यांचे नाव अलेल्या मूळ रेशन कार्डची फोटोकॉपी
>> बाळाचा जन्मदाखला
>> बाळाच्या पालकांचे आधार कार्ड
नवविवाहित व्यक्तिचे नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
•• लग्नाचे प्रमाणपत्र (मॅरिज सर्टिफिकेट)
•• नवीन सदस्याच्या पालकाचे रेशन कार्ड
Ration card update process
घरबसल्या रेशन कार्डमध्ये असा करा नवीन व्यक्तीच्या नावाचा समावेश करण्यासाठी सर्वात प्रथम राज्याच्या अधिकृत फूड सप्लाय वेबसाइटवर जा.तुमच्या घरातील नव्या सदस्याचे नाव ऑनलाईन सुद्धा जोडले जाऊ शकते. त्यासाठी आपल्या राज्यातील खाद्य वितरकाची अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तेथे नव्या व्यक्तीचे नाव जोडण्यासंबंधित सर्व ऑप्शन मिळणार आहेत. दिल्लीत रेशन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन वेबसाइट वर जावे लागेल.
सरकारने नुकतेच ऑनलाइन रेशन कार्ड देण्याची सुविधा केली आहे. सर्वात आधी तुम्ही NFSA या website वर जा. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्व सुविधा दिसतील. सर्वात वरच्या बाजुला Registration E-District चा ऑप्शन दिसेल.
Ration card update process करण्यासाठी आता लॉग इन आयडी क्रिएट करा.आधीपासूनच आयडी असल्यास लॉग इन करा.
>> तुम्हाला होमपेजवर नवीन सदस्याचा समावेश करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
>> येथे तुम्हाला एक नवीन फॉर्म दिसेल.
>> आता तुम्हाला कुटुंबातील नवीन सदस्यांची माहिती द्यावी लागेल.
>> पुढे महत्त्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
>> सबमिट केल्यानंतर फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
>> व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रेशन कार्ड घरपोच मिळेल.
How To Add Name In Ration Card
जर तुमच्या परिवारात एखाद्या मुलाचा जन्म झाल्यास त्याचे नाव रेशन कार्डवर दाखल करण्यासाठी प्रथम आधार कार्ड तयार करावे लागेल. आधार कार्ड शिवाय मुलांची नावे रेशन कार्डमध्ये जोडता येणार नाहीत. आधार कार्ड तयार करण्यासाठी मुलांचा जन्मदाखला याची आवश्यकता असते. सर्व कागदपत्र एकत्रित केल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांची नावे रेशन कार्डमध्ये दाखल करण्यासाठी अर्ज करु शकता.
Types of Ration Card
रेशन कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.खासकरून BPL कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे. रेशन कार्डचा उपयोग करून कमी किंमतीत अन्नधान्य घेता येते. याशिवाय, रेशन कार्ड हे आधारप्रमाणे महत्त्वाचे ओळखपत्र,पत्त्याचा पुरावा देखील आहे. Types of Ration Card आर्थिक निकषानुसार तीन वेगवेगळे रेशन कार्ड दिले जातात.
1). वर्षाला १० हजारांच्या उत्पन्न असलेल्यांना बीपीएल (BPL- Below Poverty Line) कार्ड,
2). वर्षाला १० हजारांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या APL (Above Poverty Line) कार्ड
3). निश्चित उत्पन्न नसलेल्यांना AAY कार्ड जारी केले जाते. वेगवेगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे.