Close Visit Mhshetkari

Rabi MSP 2023 खुशखबर..रब्बी हंगामातील गहू हरभरा,सूर्यफूल सह सहा पिकांच्या किमतीत मोठी वाढ

Rabi MSP 2023 : नुकताच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता खात्यात जमा करण्यात आल्याचे दिलासा मिळाला आहे.अशातच केंद्र सरकारने आज शेतकरी बांधवांना आणखी एक मोठा सुखद धक्का दिला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,केंद्राने गहू,बार्ली,हरभरा,मसूर, मोहरी आणि सूर्यफूल या पिकांच्या नवीन किमान आधारभूत किमतीं मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rabi Minimum support price

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2022-23 साठी 6 रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (Rabi MSP 2022) निश्चित करण्यात आली आहे.ज्यामध्ये गव्हासाठी 110 रुपये,बार्ली 100 रुपये,हरभरा 105 रुपये, मसूर 500 रुपये,मोहरी 400 रुपये तर,करडईच्या एमएसपीमध्ये 209 रुपयांची तर मसूरच्या आधारभूत किंमतीत कमाल 500 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

रब्बी किमान आधारभूत किंमतीत

बार्लीची “किमान आधारभूत किंमत” 1,635 रुपये होती.यामध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ती 1,735 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.

हे पण पहा --  7th Pay Commission : मोठी बातमी..दिवाळीपूर्वीच बोनस/सणअग्रीम आणि 38% DA सह जमा होणार ऑक्टोबरचा पगार !

मसूरचा जुना एमएसपी 5,500 रुपये प्रति क्विंटल होता.ज्यामध्ये 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे मसूर 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे.याशिवाय मोहरीच्या 400 तर,सूर्यफुलाच्या भावात प्रतिक्विंटल 209 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

1 thought on “Rabi MSP 2023 खुशखबर..रब्बी हंगामातील गहू हरभरा,सूर्यफूल सह सहा पिकांच्या किमतीत मोठी वाढ”

Leave a Comment