Close Visit Mhshetkari

PVC Pipeline scheme : पाईप लाईन अनूदान योजना सुरू,असा घ्या लाभ

PVC Pipeline Subsidy :आज आपण सरकारी अनुदान योजना संदर्भात जाणून घेणार आहोत, त्याच बरोबर शेतीसाठी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा हे देखील जाणून घेणार आहोत.महाडीबीटी पोर्टलवर विविध शासकीय योजनांचे अर्ज भरून घ्यावे असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सोबतच विविध शासकीय योजनांचे अर्ज शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर भरू शकतात.

पाईपलाईन अनुदान योजना 

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या अनेक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो.आज आपण पाईप लाईन योजना चा कसा लाभ मिळतो किंवा याबद्दल अटी-शर्ती (Terms and conditions) याचा अर्ज कसा करायचा या सर्वांबद्दल ची माहिती आपण येथे पाहणार आहोत.

शेती विषयी राबवल्या जाणाऱ्या योजना अर्थातच ‘एक अर्ज एक शेतकरी योजना अनेक’ च्या अंतर्गत राबविल्या जातात.जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टल  च्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप (PVC पाइप) किंवा एचडीपीए पाईप (HDPA pipe) साठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते.

MahaDBT portal scheme

पाईपलाईन अनुदान योजना यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे अर्ज करत असताना ,तुमच्याकडे किंवा कोणाकडेही असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे.

हे पण पहा --  MahaDBT Portal Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर व कृषी अवजारे करिता अर्ज सुरू, तब्बल एवढी सबसिडी

 शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही सिंचन करत आहात तर त्याबद्दल ची माहिती अर्जात भरणे खूप आवश्यक आहे. तरच आपल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळू शकेल नाहीतर अशा प्रकारचे अनेक अर्ज वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात त्यावर कोणतीही पुढील शासकीय कारवाई होत नाही. त्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सातबाराला देखील या सिंचनाची नोंद असणे खूप आवश्यक आहे.

पाईप लाईन योजना महाराष्ट्र

पीव्हीसी पाईप लाईन योजना महाराष्ट्र  अंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना (Subsidy for farmers) दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाइप साठी 35 रुपये प्रति मीटर, जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.

 एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केली असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.

Leave a Comment