Close Visit Mhshetkari

Poultry farm yojana : 1 हजार मांसल पक्षी संगोपन योजना सुरू! 2 लाख 25 हजार अनुदानासाठी येथे करा ऑनलाईन अर्ज

Poultry farm yojana : पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन विभागा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना साठी ऑनलाईन पद्धतीने फाॅर्म भरणे चालू आहे.

Poultry farm yojana Maharashtra

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 11.1.2023  असून लाभार्थ्यांची प्राथमिक निवड  14 ते 18 जानेवारी 2023 रोजी प्राथमिक निवड केली जाईल. पोल्ट्री फार्मसाठी अनुदान (Goat Farming loan) मिळणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

कुक्कुटपालन योजना कागदपत्रे

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) सातबारा (अनिवार्य)
३) 8 अ उतारा (अनिवार्य)
४) अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) आधारकार्ड (अनिवार्य )
६) रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

कुक्कुटपालन पालन योजना (Agriculture technology) साठी खालील प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल

  •  जमीन – लाभार्थी स्वत : ची/भाडेपटटीवर घेतलेली
  •  पक्षीगह 1000 चौ फुट,स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण
    लाभार्थी / शासन
    2,00,000/-
  •  उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी  ब्रुडर इ.
    लाभार्थी /शासन 25000/-
  • एकूण खर्च
    2,25,000/-

1 ) शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ % (१,६८,७५०/-)
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ % (५६,२५०/-)

2) शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० % (१,१२,५००/-)
स्वहिस्सा सर्वसाधारण ५०% (१,१२,५००/)

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment