Close Visit Mhshetkari

पोस्टाची योजनाच लय भारी,अवघ्या 299 रुपयांत 10 लाख रुपये विम्याची जबाबदारी Postal Insurance

Postal Insurance : भारतीय टपाल खाते अगदी स्वस्तात विमा कवच पुरविणार आहे.अवघ्या 299 आणि 399 च्या वार्षिक हप्त्यामध्ये विमाधारकास 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पोस्ट ऑफिसने नवीन योजना सुरू केली आहे.आज आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

postal insurance
postal insurance

Post office Accident Insurance Scheme

1) 299 रुपयांची पॉलिसी अपघाती मृत्यू,कायमचे संपूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यासाठी 10 लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करेल. याशिवाय, 299 रुपयांचा विमा अपघात उपचारांसाठी 60,000 रुपयांपर्यंत IPD खर्च आणि OPD दाव्यांसाठी 30,000 रुपयांपर्यंत प्रदान करेल.(Post office Accident Insurance Scheme) 2) 399 रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व किंवा 10 लाख रुपयांचे कायमचे आंशिक अपंगत्व, IPD वैद्यकीय दाव्यासाठी 60,000 रुपयांपर्यंत अपघाती इजा, 30,000 रुपयांपर्यंत ओपीडी दावा,1 लाख रुपयांपर्यंत दोन मुलांचे शिक्षण समाविष्ट आहे. दहा दिवस रुग्णालयात दररोज हजार, कुटुंबाचा वाहतूक खर्च रु. 25,000,अंत्यसंस्काराचा खर्च रु. 5,000 पर्यंत.

भारतीय डाक विभाग अर्थात India Post Office ने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. 299 आणि 399 रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत 10 लाख रुपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला वर्षभरात एकदाच 299 किंवा 399 रुपये भरायचे आहेत. त्या बदल्यात तुम्हाला वर्ष भरासाठी सुमारे 10 लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

एक वर्षानंतर पुढील वर्षासाठी योजना सुरू ठेवण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षासाठी अपघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येईल.या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.

तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल,तर तुमचे इंडिया चार पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभधारक होऊ शकता.

पोस्ट ऑफिस विमा योजना

पोस्ट ऑफिस विमा योजना – वय वर्षे 18 ते 65 वर्षीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू यात कव्हर आहेत. त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपये आणि किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल.

>> अपघाती मृत्यू – 10 लाख

>> कायमचे अपंगत्व – 10 लाख

>> रुग्णालयाचा खर्च- 60 हजार रुपये

>> मुलांचा शैक्षणिक खर्च – प्रति बालक रु 1 लाखांपर्यंत (जास्तीत जास्त 2 मुले)

>> प्रवेश होईपर्यंत दररोज – रु.1000 (10 दिवस)

>> ओपीडी खर्च – रु.30000

>> अपघाती पक्षाघात झाल्यास – 10 लाख

>> कुटुंबाचा हॉस्पिटल प्रवास खर्च – रु 25000

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता

पोस्ट ऑफिस विमा योजनेसाठी पात्रता

उमेदवारांकडे IPPB खातेधारक असणे आवश्यक आहे

उमेदवारांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान.

TAG पॉलिसीमध्ये खाली दिलेल्या व्यक्ति/ व्यवसाय/ परिस्थिति मुळे झालेले अपघात/ नुकसान कव्हर मिळत नाहीत. 

1. साहसी खेळामध्ये सहभाग (बजी जग, स्त्रीग रेसिंग)

2. लष्कर, नौदल, हवाई दल आणि पोलीस दलात असलेल्या व्यक्ति

3. आरोग्यासंदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती / आजार मुळेच

4. उपचार करणारे डॉक्टर जे (अ) स्वतः विमाधारक अती असेल किवा बापा पॉलिसीमध्ये समाविष्ट सदस्य असेल

5. आत्महत्या

6.अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थाच्या प्रभाव असल्याने प्रत्यक्ष किंवा केलेल्या गुन्ह्यात सहभाग, दंगल, गुन्हा गैरवर्तनन

7. उपकरणांचे किरण तिवारी, स्फोटक किंवा इतर धोकादायक गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी

8.आवश्यक नसताना रुग्णाला उपचार

9. गर्भधारणेमुळे होणारे कोणतेही नुकसान

10. काही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती व्यावसायिक

11. युद्ध किया युद्धाची कोणतीही कृती आक्रमण विदेशी कृती आतंकवादी कारवाया होणारे कोणतेही

12 बांधकामाशी संबंधित कामगार

Postal insurance policy

1.पॉलिसी डॉक्युमेंटल 7-10 दिवसांत ईमेलमधून डाउनलोड करता  येते.पॉलिसीची हार्ड कॉपी पाठवली जात नाही

2. पॉलिसी ऑटो रिन्यूअरु उपलब्ध नाही

3. वेटिंग पिरीयड नाही करू होत

4. क्लेम कसा करावा ? TATA इन्फ्री 1800-266-7780 क्रमांकावर सर्व माहिती आणि मदत पुरविली जाते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment