Close Visit Mhshetkari

Post Office Job : पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही परीक्षा न देता बंपर भरती! लगेच करा अर्ज

Post Office Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेले असून भारतीय डाक विभागात आता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची चांगली संधी चालून आलेली आहे पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत भरती सुरू असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

Post office job Maharashtra

इंडियन पोस्ट अंतर्गत पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभागासाठी प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये संबंधित पदासाठी लागणारी शैक्षणिक अहर्ता वय मर्यादा कागदपत्र अर्जाची शेवटची तारीख पगार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सदरील भरती ही सरकारी नसून करार पद्धतीने भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारास कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे प्रशिक्षण केल्यानंतर त्यांना एक परवाना देण्यात येईल उमेदवाराला तात्पुरती परवानासाठी 50 रुपये व परवाना परीक्षेसाठी 400 भरावे लागणार आहे.

पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्रतिनिधी पदासाठी पात्र उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही थेट मुलाखती द्वारे अशा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार कार्यालयाकडे राहणार आहे.

हे पण पहा --  Tax Free FD पेक्षा जास्त व्याज देईल पोस्टाची 'ही' योजना! मुलांच्या नावानंही करू शकता गुंतवणूक; पहा सविस्तर ...

पोस्ट ऑफिस भरती पात्रता

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान तसेच संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव असावा.

अर्ज दाखल करावयाचा पत्ता :- पात्र उमेदवारांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

मुलाखत :- दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाईल.

आवश्यक कागदपत्र :- उमेदवारांनी मुलाखतीला येताना शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड,आधार कार्ड (मूळ प्रत आणि 1 झेरॉक्स), 3 फोटो आणि अन्य 3 महत्वाचे कागदपत्र सोबत आणणे गरजेचे आहे.

अधिकृत वेबसाइट :– संबंधित जाहिरातीसाठी भारतीय पोस्ट ऑफिसच्या च्या www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पोस्ट ऑफिस भरती संदर्भात सविस्तर माहिती व जाहिरात येथे पहा

Post office job

4 thoughts on “Post Office Job : पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही परीक्षा न देता बंपर भरती! लगेच करा अर्ज”

Leave a Comment