Close Visit Mhshetkari

Pitru paksha niyam पातृपक्षात कोणत्या दिवशी पितरे घालावे,जाणून घ्या निमम,तिथी,आख्यायिका

Pitru paksha : पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते.पितृ पक्षात पूर्वजांची पूजा विधीपूर्वक केली जाते.पितृपक्षात पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो,असे मानले जाते. यावेळी पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी श्राद्ध तसंच पिंड दान केले जाते.
pitru paksha niayam
pitru paksha niayam

Pitru Paksha or Shradh Niyam

भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात,विष,शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध केले जाते.भाद्रपद अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हणूनही संबोधले जाते.अमावास्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल,अशा सर्वांनी सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे.
कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे,असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे. भाद्रपद अमावास्येला सर्वपित्री अमावास्या म्हणूनही संबोधले जाते. अमावास्येला दिवंगत झालेल्या व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध केले जाते. याशिवाय ज्या व्यक्तींना आपल्या दिवंगत पूर्वजांची निधन तिथी ज्ञात नसेल, अशा सर्वांनी सर्वपित्री अमावास्येला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक वा अपमृत्यू पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे, असे विधान शास्त्रात देण्यात आले आहे.
भाद्रपद नवमीला अविधवा नवमी असे संबोधले जाते.या दिवशी अहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना (सवाष्ण) मृत झालेल्या महिलेचे श्राद्ध केले जाते.भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते याचे फलस्वरुप पूर्वजांना पुण्यदान मिळते आणि त्यांना मुक्ती मिळते,अशी मान्यता आहे. भाद्रपद द्वादशीला दिवंगत सन्यासी व्यक्तींचे श्राद्ध केले जाते.

When Is Pitru Paksha or Shradh In Marathi

कॅलेंडरनुसार,पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. आश्विन महिन्यातील अमावास्येला तो संपते. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबर २०२२ शनिवारपासून सुरू होणार आहे आणि पितृ पक्ष २५ सप्टेंबर २०२२ रोजी संपेल. हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे पिंडांचे दान केल्याने पित्रांना मिळतो मोक्ष – असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या काळात पिंड दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तसेच पिंड दान केल्याने कुंडलीतून पितृदोषापासून मुक्ती मिळते.
पितृ पक्ष २०२२ प्रारंभ तारीख आणि वेळ कधी आहे ?
  • १० सप्टेंबर २०२२ : पौर्णिमा भाद्रपद
  • ११ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष प्रतिपदा आश्विन मास
  • १२ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष द्वितीय, आश्विन मास
  • १३ सप्टेंबर २०२२ : तृतीय कृष्ण पक्ष आश्विन मास
  • १४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी
  • १५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी
  • १६ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी १७ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी
  • १८ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी
  • १९ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी २० सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी
  • २१ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशी तिथी
  • २२ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी
  • २३ सप्टेंबर २०२२ : आश्विन मास, त्रयोदशी, कृष्ण पक्ष
  • २४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी
  • २५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील अमावस्या आणि पितृपक्ष का समापन पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी.
हे पण पहा --  Pitru Paksha : पितृपक्षात चुकूनही 'या' गोष्टी करू नका,जाणून घ्या महत्त्व आख्यायिका सर्व माहिती

Importance Of Pitru Paksha In Marathi

हिंदू धर्मात ज्योतिषीय गणनेनुसार आपल्या पितृ कुंडलीमध्ये सुख आणि स्थैर्याचा स्वामी असतो. सुख आणि स्थैर्य म्हणजे नोकरी-व्यापारातील प्रगती आणि धनप्राप्ती, तसंच लग्न आणि संतती संतुलन राहून सुख मिळावं. जे फक्त पितरांच्या कृपेने शक्य आहे. कुटुंबाच्या वंशवृद्धीसाठी आणि सुखासाठी आपल्याला त्यांचा आशिर्वाद मिळावा.
खरंतर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक तर्पण करावं असं म्हणतात. पण लोकांच्या व्यस्त आयुष्यामुळे ते करणं शक्य नाही. त्यामुळे वर्षातून एकदा श्राद्धकाळ म्हणजेच पितृपक्षात ते केलं जातं. आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी आहे.

श्राद्ध करायचे नियम

 पितृपक्षात खालील ‘श्राद्ध करायचे नियम’ पाळावेत
1) श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे.
2)श्राद्धात यशाशक्ती ब्राह्मण भोजन करवावे. शक्य नसल्यास एक तरी ब्राह्मणाला भोजन करवावे.
3. ब्राह्मणाला भोजन करवताना वाढत असलेल्या भांडी दोन्ही हाताने धरावे.भोजन दोन्ही हाताने प्रदान करावे.पितरांच्या पसंतीचे असल्यास अती उत्तम असतं.
4. श्राद्ध स्वत:च्या घरात करावे. दुसर्‍यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे. तसेच तीर्थ स्थळ किंवा मंदिरात श्राद्ध करायला हरकत नाही.
4. धर्म शास्त्र ज्ञानी असलेल्या ब्राह्मणाला भोजन करवावे. कारण श्राद्धात पितरांची तृप्ती ब्राह्मणाद्वारे होते.
5. शक्य असल्यास श्राद्धात कुळातील मुली, जावई, नातवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावावेवंड यांनाही प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावावे.
6. श्राद्धाच्यावेळी दारावर भिकारी आल्यास त्यालाही आदरपूर्वक भोजन करवावे. पितर कोणत्याही रूपात येऊ शकतात.
7. भोजन झाल्यावर ब्राह्मणांना घराच्या दारापर्यंत सन्मानपूर्वक विदा करावे. ब्राह्मण भोजनानंतर कुटुंबातील इतर लोकांनी प्रसाद ग्रहण करावे .

श्राद्धशी संबंधित आख्यायिका

 “श्राद्धशी संबंधित आख्यायिका “जेव्हा महाभारत युद्धात महान दाता कर्णाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला, जिथे त्याला अन्न म्हणून सोने आणि रत्ने अर्पण करण्यात आली. तथापि, कर्णाला खाण्यासाठी खऱ्या अन्नाची गरज होती आणि त्याने स्वर्गाचा अधिपती इंद्राला अन्न म्हणून सोने देण्याचे कारण विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले, पण श्राद्धात आपल्या पितरांना कधीही अन्न दिले नाही. कर्ण म्हणाला की तो त्याच्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्यामुळे त्याने कधीही त्याच्या स्मरणार्थ काहीही दान केले नाही.
सुधारणा करण्यासाठी, कर्णाला 15 दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो श्राद्ध करू शकेल आणि त्याच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल. हा काळ आता पितृ पक्ष म्हणून ओळखला जातो
टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

1 thought on “Pitru paksha niyam पातृपक्षात कोणत्या दिवशी पितरे घालावे,जाणून घ्या निमम,तिथी,आख्यायिका”

Leave a Comment