Close Visit Mhshetkari

Phone pe साठी नवीन नियम आले! आता करता येणार ‘एवढेच’ व्यवहार | UPI Payment limit

UUPI Payment limit : सध्याच्या काळात आपण सर्वजण छोट्या मोठ्या गोष्टी साठी सुध्दा करतो.तुम्ही जर UPI payments करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गुगल पे ( GooglePay), फोनपे (PhonePay) ॲमेझॉन पे (Amazon Pay) आणि पेटीएम( PayTm) अशा सर्वच कंपन्यांनी पेमेंटवर लिमिट लावले आहे.

UPI Payment New rule

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार आता यूपीआय पेमेंट करण्यासंदर्भात नवीन गाईडलाईंन्स  जारी करण्यात आली आहे.आता UPI मधून आपण दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता.त्याचबरोबर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25 हजारांपर्यंत निश्चित केली आहे.

ॲमेझॉन पेमेंट करणाऱ्यांना 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे पाठवता येणार आहेत. Amazon Pay UPI रजिस्ट्रेशननंतर 24 तासांनी तुम्हाला केवळ 5000 रुपये पहिले पाठवता येतील.तर बँकेने 20 व्यवहार करता येणार आहेत.

Paytm UPI payment

पेटीएम च्या नवीन नियमानुसार युजर्ससाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. Paytm ने दर तासाला किती रक्कम पाठवायची याची मर्यादा सुध्दा घालून दिली आहे.

हे पण पहा --  Upi Lite In PhonePe : आता 10 - 20 रुपयांचे ट्रँजॅक्शन बँकेच्या पासबुकवर नको ? मग आपल्या PhonePe वर वापरा ही पद्धत ...

पेटीएम च्या नवीन नियमानुसार,आता तुम्ही दर तासाला फक्त 20 हजार रुपयांचेच व्यवहार करू शकता. याशिवाय तासाला 5 व्यवहार आणि एका दिवसात फक्त 20 व्यवहार करता येणार आहेत.

गुगल पे (Google Pay) अपद्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी केवळ 10 ट्रान्झाक्शनची मर्यादा आहे. त्यामुळे पेमेंट करताना आता जपूनच करा. नाहीतर तुमचे लिमिट संपले तर ट्रान्झाक्शन होणार नाही.

तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येऊ शकतात. या ॲप्समध्ये प्रत्येक तासाची मर्यादा नसते. गुगल पे आणि फोनपेवर दर तासानुसार कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment