Close Visit Mhshetkari

Personal Loan offers : 2023 मध्ये या बॅंक देत आहेत सर्वात स्वस्त पर्सनल लोन ! पहा ऑफर

Personal Loan : कोरोनाच्या काळात (Covid-19) लोकांच्या आरोग्याबरोबरच खिशावरही वाईट परिणाम झाला आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली असून अनेक अडचणींच्या प्रसंगी कर्ज घेण्याची वेळ आली आहे.यामुळे सध्याच्या काळात वैयक्तिक कर्जाची (Personal Loan) मागणी खूप वाढली असून,लोक स्वस्त वैयक्तिक कर्जाचा शोध घेत आहेत.

Personal Loan offers 2023

आर्थिक संकटकाळी वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय मानला जातो.गावठी व्याजाने कर्ज घेण्यापेक्षा तुमचे खाते असलेल्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेणे कधीही चांगले असते.हे कर्जही त्वरित उपलब्ध होते आणि कागदपत्रे कमी लागतात.

Personal Loan वरील व्याजदर सामान्यतः 9.55 % ते 21% पर्यंत असतो.वैयक्तिक कर्जाचा व्याजदर दर तुमची बँक,कर्जाचा प्रकार, क्रेडिट स्कोअर,विद्यमान कर्ज,उत्पन्न आणि कर्जाची रक्कम यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो.

Personal Loan 2023

Personal Loan 2023 घेण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे.सर्व बँकांना समान व्याजदर नाही.बँकांचे व्याजदर कमी किंवा जास्त असू शकतात.तुम्हाला स्वस्त कर्ज मिळेल,यासाठी खालील बँकांची यादी पाहा आणि त्यांच्या व्याजदराची तुलना करा आणि कमी व्याजदर आकारणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्या.आज आपण काही बँकांबद्दल जाणून घेऊया जे स्वस्तात ‘Personal loan’ देतात.

Personal loan bank list

HDFC Bank personal loan

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. दरम्यान, बँकेच्या वेबसाईटनुसार ओव्हरनाईट एमएलसीआर आता 8.30 टक्क्यांवरून आता 8.55 टक्के झाले आहे. यात 20 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB)

पंजाब नॅशनल बँक देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB वैयक्तिक कर्जावर 10.15 टक्के ते 16.70 टक्के व्याजदर आहे. बँकेतील कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत आहे. बँकेतील वैयक्तिक कर्जाचा कालावधी 60 महिन्यांपर्यंत असतो.

SBI Personal offers

वैयक्तिक कर्जाचे व्याज दर 10.90% प्रतिवर्ष पासून सुरू होतात. या बँकेकडून 6 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयां पर्यंत कर्जाची रक्कम देते.SBI पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज देखील देते.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.10 टक्क्यांपासून सुरू होतो. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत उपलब्ध असेल. बँक ऑफ इंडियामध्ये वैयक्तिक कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

IDFC फर्स्ट बँक

या खाजगी बँकेत वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के व्याजदर आहे. या बँकेतील कर्जाचा कालावधी 6 ते 60 महिन्यांचा असेल. कर्जाची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत आहे.

हे पण पहा --  Bank Loans: तुम्ही बँकेकडून किती प्रकारचे लोन घेऊ शकता ? पहा संपूर्ण माहिती

फेडरल बँक

या खाजगी बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के ते 17.99 टक्के व्याजदर आहे. बँकेत 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते. कर्जाचा कालावधी 48 महिन्यांचा असेल.
बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील वैयक्तिक कर्जावरील प्रारंभिक व्याज दर 9.25 टक्के आहे. 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज बँकेत दिले जाऊ शकते. बँकेतील कर्जाचा कालावधी 84 महिन्यांपर्यंत आहे.

IDBI बँक

IDBI बँकेचा वैयक्तिक कर्जावर 10.25 टक्के ते 15.50 टक्के व्याजदर आहे. व्याजाचा कालावधी 12 ते 60 महिन्यांचा असेल.

Personal loan document list

पगारदारांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी :-

  • ओळखपत्र:- पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसेन्स/मतदानपत्र/पॅन कार्ड (कोणतेही एक)
  • रहिवासी प्रमाणपत्र:-लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट 
  •  मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (जेथे वेतन जमा होते).
  •  मागील 3 महिन्यांचे पगारपत्रक
  •  2 पासपोर्ट साईझ फोटो
  •  इनकम टॅक्स 
  •  इतर कर्ज असल्यास त्याचे बॅंक स्टेटमेंट

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज मागणी करत असलेल्या स्वयंरोजगारांसाठी
 
आवश्यक कागदपत्र यादी:-

•केवायसी कागदपत्रे: ओळखपत्र- आधार कार्ड, पॅन कार्ड

•जन्मतारखेचा दाखला.

•रहिवासी दाखला:- -लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट (कोणतेही एक)

•उत्पन्नाचा दाखला (मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक  व्यवहार).

•मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.

•एक रहिवासी दाखला.

•रहिवासी किंवा ऑफिस मालक असल्याचा दाखला.

•व्यवसाय चालू असल्याचा दाखला.

•इतर कर्ज असल्यास त्याचे बॅंक स्टेटमेंट

प्रत्येक बँकेचे व अटी लागू , तसेच बँक Personal loan document list अतिरिक्त मागविण्याचा हक्क राखून ठेवते. 

50 हजार रुपये मुद्रा लोन विषयीच्या सगळ्या माहिती साठी
                    मुद्रा लोन ऑफर

पर्सनल लोन

मित्रांनो “पर्सनल लोन” संबधी माहिती आवडली असेल तर नक्की लाइक करा व शेअर करा.

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment