Close Visit Mhshetkari

Pay commission : वेतन आयोग म्हणजे काय? वेतन आयोग कधी आणि कोण लावते? पहा नवीन वेतन आयोगानुसार किती वाढणार पगार..

Pay Commission : केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे नवीन वेतन आयोग राज्य व केंद्र अशा दोन्ही पातळीवर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात निर्माण केलेली प्रशासकीय व्यवस्था म्हणजे वेतन आयोग होय

New pay commission

भारतीय राज्यघटनेचा विचार करायचा झाला तर भारतीय राज्यघटनेत कोणत्याच मार्गदर्शक तत्वात आणि कलमांमध्ये नवीन वेतन आयोगाचा उल्लेख आढळत नाही.देशाचे पंतप्रधान नवीन वेतन आयोगाची स्थापना करतात.

वेतन आयोग सुमारे दर दहा वर्षांनी गठीत करण्यात येऊन दोन वर्षाच्या कालावधीत आपला अहवाल सादर करतात.आयोगाची सदस्यसंख्या लवचिक असून त्यात राज्यमंत्री दर्जाचा एक अध्यक्ष, काही अंशकालीन सभासद आणि एक पूर्णकालीन सचिव यांचे मिळून ही समिती पंतप्रधानांकडून तयार केली जाते.

वेतन आयोग इतिहास

वेतन आयोगाचा इतिहास सांगायचे झाले तर पहिला वेतन आयोग १९४६ साली स्थापन झाला आणि १९४७ साली त्याचा अहवाल सरकारला दिला गेला.

दुसरा वेतन आयोग सन १९५७ साली स्थापन झाला व त्याचा अहवाल दोन वर्षानंतर जाहीर झाला.

तिसरा वेतन आयोगाची स्थापना १९७० साली झाली तर १९७३ त्याचा अहवाल जाहीर झाला.

चौथा वेतन आयोग १९८३ साली स्थापन करण्यात येऊन,त्याचा अहवाल १९८७ साली जाहीर करण्यात आला. 4 थ्या वेतन आयोगाने या चार वर्षांच्या कालावधीत आपला अहवाल तीन टप्प्यात सादर केला.
4 था वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगारवाढ: 27.6%
किमान वेतनश्रेणी: रु 750

हे पण पहा --  Group Insurance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित

पाचवा वेतन आयोग १९९४ साली स्थापन झाला.आयोगाचा अहवाल १९९७ साली जाहीर करण्यात आला आणि त्याच्या शिफारसी १ जानेवारी १९९६ पासून लागू करण्यात आल्या.
5 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगारवाढ: 31%
किमान वेतनश्रेणी: रु 2,550

सहावा वेतन आयोग २००६ साली स्थापन झाला आणि त्याच्या शिफारसी २००८ साली सरकारकडे देण्यात आल्या. या शिफारसी १ जानेवारी २००६ पासून लागू झाल्या.
6 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर : 1.86 पट
पगारवाढ : 54%
किमान वेतनश्रेणी : रु 7,000

सातवा वेतन आयोग २०१३ साली स्थापन होऊन २०१४ साली त्याच्या शिफारसी सरकारकडे देण्यात आल्या.जुलै २०१६ मधे सरकारने या शिफारसींपैकी काही लागू करण्याचा निर्णय घेतला आणि १ जानेवारी २०१६ पासून या शिफारसी लागू करण्यात आल्या आहेत.

सातवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
पगारवाढ: 14.29%
किमान वेतनश्रेणी: रु. 18,000

8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ?

आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.
आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर : 3.68 पट
पगारवाढ : 21 %
किमान वेतनश्रेणी : रु 26000

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

2 thoughts on “Pay commission : वेतन आयोग म्हणजे काय? वेतन आयोग कधी आणि कोण लावते? पहा नवीन वेतन आयोगानुसार किती वाढणार पगार..”

Leave a Comment