Close Visit Mhshetkari

Pashu Adhar card : आता गाई म्हशीचे देखील काढले जाणार आधार कार्ड, पहा सर्व माहिती

Pashu Adhar card : मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, कि आपल्या गुरांचे म्हणजे गायी म्हशींचे देखील आधार कार्ड असून त्यांना सुद्धा आधार नंबर दिला जाणार आहे.’आपले सरकार पशु आधार’ ची तयारी करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनामध्ये सांगितले आहे.चला तर मग या पशु आधार कार्ड ची सविस्तर माहिती आपण आपल्या या लेखात बघूया. 

What is Pashu Adhar card?

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाय, म्हैस, बैल यांना लाळ, खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण व बिल्ले मारले जाणार आहे. आधार कार्डवर त्यांची नोंद इनाफ प्रणालीवर केली जात असून, जनावरा माहिती ही सर्व माहिती इंटरनेटवर ऑनलाइन पद्धतीने बघायला मिळणार असून आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत 55 हजार जनावरांना लसीकरण व बिल्ले मारून आधार कार्ड (What is Pashu Adhar card?) तयार होण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

आपले सरकार पशु आधार योजना

देशात लवकरच आपले “सरकार पशु आधार योजना” सुरू होणार असून चार कोटी जनावारांचे काढले जाणार आधारकार्ड ‘Aadhaar for Animals’ काढले जाणार असून पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या (Ministry of Animal Husbandry and Dairy Development) ही माहिती उपलब्ध झाली देशात 30 कोटींपेक्षा अधिक गाय,म्हशी असुन त्यात फक्त 4 कोटी गायी आणि म्हशींचे आधार कार्ड (Buffalo Aadhar Card) बनवण्यात आले आहे. एक मोहीम राबवून त्यांचं टॅगिंग केलं जाणार बकरी, मेंढ्या इत्यादी चे आधार कार्ड बनणार असून या कार्डमध्ये एक यूनिक नंबर,मालकाचे विवरण आणि जनावरांचे लसीकरण (vaccination) आणि ब्रीडिंगची माहिती असणार आहे.

ई-गोपाळा (e-Gopala App)

ई-गोपाळा सुरू करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पशु आधार कार्ड उल्लेख केला असताना. त्यांनी सांगितलं होतं की, या App मध्ये पशु आधार कॉर्डचे काम पूर्ण येईल.त्यामुळे जणवरा विषयी सपुर्ण माहिती मिळू शकेल. जनावरांची खरेदी-विक्रीही त्यामुळे सोपी होणार आहे.

जनावरांचे टॅगिंग व आधार कार्ड

जनावरांचे टॅगिंगच (Tagging of animals) यांचे आधार कार्ड बनणार आहेत.देशातील प्रत्येक गाय आणि म्हशी यांच्या साठी एक विशिष्ट युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Number) सुरू करण्यात येईल.

याच्या माध्यमतून जनावरांचे मालक आपल्या प्राण्यांबाबत घरबसल्या सगळी माहिती मिळवू शकतात. लसीकरण, जात, सुधारणा कार्यक्रम,उपचारांसह सर्व कामे यामुळे सोपी होणार आहेत.याबरोबरच जनावरांची खरेदी-विक्री करणे सुध्दा यामुळे सोपी होणार आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment