Omicron Virus |
करोनाचा नवा विषाणू ओमेक्रॉनने जगाची चिंता वाढवली असून यानंतर अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केलीली आहे.
Omicron Virus
सध्यस्थितीत जगामध्ये नविन ओमिक्रॉन वेरियंट मुळे चिंतेचे वातारण पसरले आहे.करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे.या ओमिक्रॉन वेरियंटची लक्षणे कोणती ? उपाय कोणते? काळजी काय घ्यावी याची माहिती या वेरियंटचा शोध लावणाऱ्या आफ्रिकेतील डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी दिली आहे, त्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
|
करोना व्हायरसचा नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉन वेरिएंटच्या बातमीने संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुध्दा ओमिक्रॉन वेरियंट चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. आफ्रिका,अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत करोनाचा ओमिक्रॉन प्रकार शोधणाऱ्या डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांनी या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे ती आपण या लेखात पाहणार आहे.
|
ओमिक्रॉनचा रुग्णावर काय परिणाम होतो?
ओमिक्रॉन विषयी डॉक्टरांनी दिलासादायक बातमी दिली आहे. आतापर्यंत ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रूग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी रोगाची तीव्रता अधिक असू शकते.
ऑमिक्रॉनचा संसर्ग झालेले आतापर्यंतच्या कोणत्याही रुग्णांचे लसीकरण झालेले नव्हते. त्यांच्या मध्ये ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे होती. युरोपमध्येही मोठ्या संख्येत नागरिकांना ओमिक्रॉन झालेला असावा असा एक अंदाज आहे.Omicron आतापर्यंत ओमिक्रॉन झालेल्या पैकी बहुतेक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, असे अँजेलिक कोएत्झी सांगितले.
ओमिक्रॉनची काही लक्षणे आहेत जी पूर्णपणे वेगळी आहेत. संसर्ग झालेल्यांना ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य आहेत. तसेच रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे होतआहेतअसं डॉ.अँजेलिक कोएत्झी यांचे म्हणणे आहे.
ओमिक्रॉनची लक्षणे काय आहेत ?
- ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा जाणवतो.
- घसा खवखवणे,
- स्नायू दुखणे,कोरडा खोकला यासारख्या समस्या असतात.
- शरीराचे तापमान वाढते.
- पातळ जुलाब होणे
ही लक्षणे करोनाच्या डेल्टा वेरियंट पेक्षा खूपच वेगळी आहेत, असे द.आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या सदस्या डॉ.अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या आहे.लसीकरणाचा ओमिक्रॉनवर किती परिणाम होतो
डेल्टा,अल्फा, बीटा आणि गॅमा या कोरोना विषाणूच्या अन्य चिंताजनक प्रकारांवरही लस प्रभावी ठरत आहे.
लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, असं आतापर्यंत स्पष्ट झालं आहे. लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचं प्रमाणही कमी असल्याचं तज्ञांनी नोंदवलं आहे.
ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं.
तेव्हा मित्रांनो भारतातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.”Omicron Virus“ लसीकरण करून घेणे खूप महत्वाचे असून घरातील लहान मुलांना जपणे खूप आवश्यक आहे. कारण मुलांच्या मुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यांचे लसीकरण अजून झालेले नाही. तेव्हा परत निर्बंध लागू नये म्हणून सरकारचे नियम पाळूया आणि आपली व कुंटूंबाची काळजी घेऊया.
मित्रांनो ओमायक्रॉन विषयीची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली तर नक्कीच शेअर करा