Close Visit Mhshetkari

New Education policy : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी… सरकारने इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय

New Education policy : इयत्ता तिसरीचे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेले असून परिक्षा संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहे.STARS केंद्रपुरस्कृत प्रकल्पामधील SIG Irnproved Learning Assessment systems) अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) आयोजन करण्यात येत आहे. 

Education policy of Student exam new

पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्याथ्यांची पायाभूत चाचणीचे आयोजन पूर्ण झालेले आहे. सदर वाधणीसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे परीक्षा साहितय (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना राज्यस्तरावर छपाई करून या कायालयमार्फत शाळांना पुरवठा करण्यात आलेला आहे.

शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांतील इ. ३ री ते ८वी वर्गामधील विद्यार्थ्यासाठी सकलित मूल्यमापन चाचणी-१ चे आयोजन दि. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ या कालावधील करण्यात येणार आहे. 

सदर संकलित मूल्यमापन चाचणी १ साठी छापील परीक्षा साहित्याचा चाचणी प्रापत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना) पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे. याबाबत पुढीलप्रमाणे सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या ज्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी जास्त शरोल तर दुसन्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्याची.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वाणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल.

चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताग देऊ नये याची दक्षता घ्यावी. चाचण्यांचा मुख्य संदेश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरुप कृतीकार्यक्रमाची आखणी करणे हा आहे.

Student exam new rules

सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.चाचणीचे माध्यम व विषय: शदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी.. तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्याथ्यांसाठी प्रथम भाषा, गणित तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल. चाचणीचा अभ्यासक्रम प्रथम सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल.

  1. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल. त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल. चाचणी निर्मिती सुंदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.
  2. संकलित मूल्यमापन चाचणी १ साठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा (चाचणी पत्रिका उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल
  3. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यानी. एखादा विद्यार्थी गैरहजर तोशाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी. ६. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
  4. शिक्षकांनी चाचणीचे घर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करून विद्यार्थ्याचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे.
  5. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार राजा / विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
  6. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुणनोंद करावी,चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.
  7. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १३२ मध्ये अध्ययन निष्पतीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
  8. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्याचाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.
हे पण पहा --  इयत्ता तिसरी दैनंदिन निरिक्षण नोंदी | Daindin Nirikshan Nondi

मूल्यमापन प्रश्नपत्रिका व परीक्षा सूचना

  • जिल्हास्तरावर चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांची असेल. 
  • विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका, शाळेस एक याप्रमाणे शिक्षक सूचनापत्र व विषयनिहाय उत्तरसूची याप्रमाणे तालुका स्तरापर्यंत पुरवठा करण्यात येईल
  • तालुकास्तरावर परीक्षा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र खोली गट शिक्षणाधिकारी यांनी ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी केंद्र स्तर व शाळास्तरावर वेळेत पोचतील याची व्यवस्था करावी. 
  • इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयकांनी करून घ्यावी.
  • केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे प्रश्नपत्रिका, शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे.. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. 
  • कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये, अथवा झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्थ बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • तालुका अंतर्गत कमी जादा संख्या तपासून शाळानिहाय परीक्षा साहित्याचे समायोजन करता येईल.
आकारिक संकलित मूल्यमापन परिक्षा
  • जिल्हांतर्गत कभी जादा समायोजनासाठी जिल्हास्तरावर ०५ टक्के अतिरिक्त परीक्षा साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सदर साहित्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याचे ताब्यात असेल व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरसे परीक्षा साहित्य पोच झाले असलेची खात्री चाचणी पूर्वी करणे आवश्यक आहे.
  • प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
  • तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे. सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच
  • चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वय गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
  • शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात येईल.

मूल्यमापन चाचणी शासन परिपत्रक येथे पहा 

Student exam

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment