Navratri puja : महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते.
या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.घटस्थापना हा नवरात्रीच्या दरम्यान केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे.कलश स्थापना हे घटस्थापनेचे दुसरे नाव आहे.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला विशिष्ट वेळेत घटस्थापना विधी करण्यासाठी चांगले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत.घटस्थापनेमध्ये देवीची पूजा समाविष्ट आहे, जे योग्य वेळी केली पाहिजे.
नवरात्री पुजा महत्त्व
आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे.
या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला Navratri) असे म्हटले जाते.
अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यता येतो.सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले.
या काळात या देवींचे दर्शन घेण्यसाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नऊ रात्री असा याचा अर्थ होतो. नऊ दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजाअर्चा करण्यात येते. तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो.दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आला आहे.
घटस्थापना पूजा विधी
>> सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला.
>> आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
>> कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
>> देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
>> कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
>> कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
>> दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
>> नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.
>> दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.
>> परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.
>> नवरात्रीमध्ये देवी दुर्गासमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवीसमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
>> मंत्र महोदधी (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:। ‘घटस्थापना पूजा विधी
नवरात्रीमागील इतिहास
१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.
२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
घटस्थापना पौराणिक कथा
श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती.नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते.
दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. नवरात्रौत्सवात देवीची ओटी भरणे हादेखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह हीदेखील माहिती जाणून घ्या.
शेतातील काळी माती, पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य (गहू किंवा कडधान्य)हळद-कुंकू, सुपारी, आणि अन्य पूजेचे साहित्य.घटस्थापना करण्यासाठी माती, पितळेचा तांब्या. पूजेसाठी जव, तीळ, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, लाल वस्त्र, , नारळ, दीप, सुपारी, गंगाजल, आंब्याचे डहाळे, नाणी, विड्याचे पान
देवीची ओटी कशी भरावी ? (Devichi Oti )
देवीला या नऊ दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते.या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते.
त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते.दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेऊन हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्या.
देवीकडून आपल्याला अधिकाधिका उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते नवरात्री म्हणजे देवी दुर्गाच्या पूजेचा पवित्र सण. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
घटस्थापना नियम
1) घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवांची सुरुवात आहे.
2) घटस्थापना हा नवरात्रीच्या दरम्यान केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे. कलश स्थापना हे घटस्थापनेचे दुसरे नाव आहे.
3) हिंदू धर्मग्रंथांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला विशिष्ट वेळेत घटस्थापना विधी करण्यासाठी चांगले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
4) घटस्थापनेमध्ये देवीची पूजा समाविष्ट आहे, जे योग्य वेळी केली पाहिजे. शास्त्रांनी चेतावणी दिली आहे की जर हा विधी चुकीच्या वेळी केला गेला तर यामुळे देवीला क्रोध येऊ शकतो.
5) घटस्थापना करण्यासाठी अमावस्या आणि रात्रीची वेळ टाळावी. प्रतिपदा चालू असताना दिवसाचा पहिला एक तृतीयांश घटस्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ आहे.
6) जर कोणत्याही कारणामुळे ही वेळ उपलब्ध नसेल तर ती अभिजित मुहूर्ताच्या वेळी करता येते. घटस्थापनेदरम्यान नक्षत्र चित्र आणि वैधृती योग टाळावेत.
7) जरी ते प्रतिबंधित नसले तरी. प्रतिपदा चालू असताना हिंदू मध्यान्ह आधी घटस्थापना करणे सर्वात महत्वाचे आहे.
7) दुपारी, सूर्योदयानंतर आणि रात्रीची वेळ म्हाणजेच सोळा घाटीच्या पलीकडे कोणत्याही वेळी घटस्थापनेसाठी मनाई आहे.
शारदीय नवरात्री घटस्थापना शुभ मुहूर्त
- अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा प्रारंभ – 26 सप्टेंबर 2022, पहाटे 3.24
- अभिजीत मुहूर्त – 26 सप्टेंबर सकाळी 11.54 ते दुपारी 12.42 पर्यंत
- घटस्थापना मुहूर्त – 26 सप्टेंबर 2022, 6. 20 AM – 10.19 AM
टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.