Close Visit Mhshetkari

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने राज्यातील शेतकरी बांधून साठी चालू केली आहे. नमो शेतकरी योजना 2023 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अर्थसंकल्प 2023 मध्ये या योजनेची अंमलबजावणीची घोषणा हि केली आहे.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्माननिधी’ योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना लवकरच मिळाण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

विधिमंळाच्या पावसाळी अधिवेशन २०२३-२४ मध्ये पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

नमो शेतकरी महासन्माननिधी योजना

नमो योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. पीएम किसान योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी वेगळ्या प्रकारे नोंदणी करण्याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकारद्वारे देण्यात आलेली नाही.

हे पण पहा --  Namo kisan : या दिवसी जमा होणार नमो शेतकरी 12 हजार! पहा यादीत आपले नाव

सदरील योजनेचा लाभ शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक वर्षापासून एप्रिल 2023 पासून मिळणार आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केलेली आहे,अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी.तसेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी
  • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
  • प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

Namo Shetkari Yojana Documents

  • पासपोर्ट साईज दोन फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • सातबारा उतारा
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक तसेच स्वतःचा मोबाईल नंबर
नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होतील यासाठी पात्रता काय आहे? हे आपण जाणून घेऊ.

  1. शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र असावा.

Leave a Comment